वॉशिंग्टन : अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील जॅक्सनविलेमध्ये शनिवारी दुपारी एका व्यक्ती अंदाधुंद गोळीबार करत कमीत कमी ३ लोकांची हत्या केली आहे. अमेरिकेत सामूहिक गोळीबाराता मृत्यूची ही घटना नवीन आहे. त्यानंतर या शस्त्रधारी व्यक्तीने स्वत:लाही गोळी घातली यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी फ्लोरिडाच्या जॅक्सनविलेमध्ये एक डॉलर जनरल स्टोरमध्ये एका बंदूकधारी व्यक्तीने काही लोकांना आपले निशाण बनवत गोळीबार केला. यात तीन लोकांचा मृत्यू झाला.
सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार जॅक्सनविलेचे शेरिफ टी के वाटर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर २० वर्षांचा गोरा व्यक्ती होता. या हल्ल्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडली आणि आत्महत्या केली. त्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले ते तीन लोक कृष्णवर्णी होते. वाटर्स म्हणाले, हल्लेखोराने आपल्या आई-वडिलांसह जॅक्सनविलेमध्ये दक्षिणेत फ्लोरिडाच्या क्ले काऊंटीमध्ये राहात होता. त्याने आपल्या वडिलांना मेसेज करून त्याचा कम्प्युटर पाहायला सांगितले. वडिलांना वाटर्सची घोषणा मिळाली आणि त्यांनी अधिकाऱ्यांना बोलावले.
जोपर्यंत अधिकाऱ्यांनी त्याच्याशी संपर्क केला तोपर्यंत त्या हल्लेखोराने डॉलर जनरल स्टोरमध्ये हल्ला सुरू केला होता. त्याने डॉलर जनरल डिस्काऊंट स्टोरजवळून जाणाऱ्या कारवर हल्ला केला. त्यानंतर स्वत:ला आत बंद करून घेतले आणि अंगावर गोळी झाडली.
याआधी बोस्टनमध्ये कॅरेबियन उत्सवादरम्यान सामूहिक गोळीबारात कमीत कमी सात लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…