Share
  • प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ

मालवणमधील बॅ. नाथ. पै सेवांगणच्या प्रांगणाला ‘चिवला’ हा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे. पांढरीशुभ्र अतिबारीक आणि चकचकीत वाळू. वर्दळ कमी असल्यामुळे आणि आसपास दुकानांची गर्दी नसल्यामुळे शांत आणि स्वच्छ असलेला किनारा. समुद्राच्या लाटा आदळून किनाऱ्यालगतच्या दगडांनी वेगवेगळे आकार धारण केले होते.

‘समुद्र अनुभवणे’ ही एक अप्रतिम अनुभूती असते. कोकणाला सागर किनारपट्टीची देणगी लाभलेली आहे. ‘कोकण’ म्हटले की, माझ्या डोळ्यांसमोर फक्त पहिल्यांदा समुद्रच येतो, बाकी नंतर तेथील अनेक गोष्टी!

मालवणमधील बॅ. नाथ. पै सेवांगणच्या प्रांगणात ‘झिम्माड महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणाला ‘चिवला’ हा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभलेला आहे. पांढरीशुभ्र अतिबारीक आणि चकचकीत वाळू. वर्दळ कमी असल्यामुळे आणि आसपास दुकानांची गर्दी नसल्यामुळे शांत आणि स्वच्छ असलेला किनारा. भल्या पहाटे किनाऱ्यावर एक नयनरम्य दृश्य नजरेस पडले. साधारण पन्नासजण जोडीने एका अंतरावर उभे राहून समुद्रात सोडलेले माशाचे जाळे ओढत होते. ते ओढताना, ते करत असलेला उच्चार, त्यानंतर एकत्रितपणे त्या जाळीचे जोरात थोडे थोडे ओढणे, मागे मागे सरकत जाणारे हे मच्छीमार आणि एका क्षणी किनाऱ्यावर असंख्य चकचकीत ताज्या फडफडत्या माशांचे किनाऱ्यावर येणे, हे पाहणे सुद्धा एक वेगळा अनुभव होता. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या माशांचे वर्गीकरण. समुद्रकिनारी पोहोचलेले असंख्य विक्रेते. लाकडी जाळीदार टोपल्या आणि प्लास्टिकचे क्रेट अगदी किनाऱ्यावरूनच बोली लावून विकत घेणारे विक्रेते. घासाघीस करत फायनल झालेला सौदा. सूर्य उगवण्याआधीच आपापल्या बोटी घेऊन समुद्राच्या मध्यावर जाऊन परतलेले काही मच्छीमार. माशांनी भरलेल्या बोटी आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हे सगळे पाहात, रंगांच्या असंख्य छटा उधळीत मागून उगवणाऱ्या सूर्यालाही नमन केले.

या ठिकाणच्या अगदी जवळ ‘रॉक गार्डन’ हे ठिकाण आहे. वाळूवरूनच समुद्राच्या लाटा अनुभवात चालत राहिलो. रस्त्यात ‘श्री देव चौकाकार प्रसन्न’ नावाचे चारी बाजूने उघडे आणि फक्त छप्पर असलेले असे मंदिर लागले. त्याचे दर्शन घेऊन पुढे चालत गेलो. ‘रॉक गार्डन’ या शब्दाचा अर्थ मुळातूनच लक्षात आला. समुद्राच्या लाटा आदळून किनाऱ्यालगतच्या दगडांनी वेगवेगळे आकार धारण केले होते. कोणाला ती एखादी देवाची मूर्ती भासत होती, तर कोणाला महाकाय राक्षस. त्यावरची मऊशार हिरवळ पाहून डोळ्याचे पारणे फिटत नव्हते. निसर्गाची किमया इतकी अद्भुत आहे की मंत्रमुग्ध झालो.

या किनाऱ्यावर फारसे शंख-शिंपले आढळले नाहीत; परंतु मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर मरून पडलेले जेलीफिश मात्र दिसले. त्यामुळे किनाऱ्यावर निळसर ठिपक्यांचा सडा पडल्यासारखे वाटत होते. कदाचित येथील पाण्यात जेलीफिश असल्यामुळेच पर्यटकांना पाण्याच्या आत जाण्यास बंदी केलेली होती. जवळपास पर्यटकांच्या राहण्यासाठी काही बंगले उपलब्ध असलेले दिसले. भटकंतीसाठी बोटी आणि काही वॉटर स्पोर्ट्सची सोयही असावी! आजूबाजूच्या हॉटेलमध्ये कोकणी पदार्थांची रेलचेल होती.
अलीकडेच गोव्याला जाऊन आल्यामुळे तेथील किनारे जसे विविध वस्तूंच्या दुकानांनी भरलेले आणि माणसांच्या गर्दीने फुललेले होते, त्या पार्श्वभूमीवर निसर्गरम्य, शांत असा चिवला बीच प्रचंड भावला. डोळे बंद करून मांडी घालून किनाऱ्यावर बसल्यावर एक तास कसा निघून गेला कळलेही नाही. मुंबईत पोहोचल्यावरही नजरेसमोर लाटांनी उधाणलेला विस्तीर्ण समुद्र आणि कानात गुंजणारी समुद्राची गाज पुढील काही दिवस निश्चितपणे सुखाची अनुभूती देणार आहे. चला तर कामातून थोडा वेळ काढूया. मुंबईत असाल तर कमीत कमी गिरगाव, दादर किंवा जुहू बीचवर तरी जाऊन समुद्र अनुभवुया. निळेशार आकाश ते निळाशार समुद्र कसा एकसंध होतो ते शोधूया. तनामनाने निसर्गात रममान होऊया.

कुठेतरी वाचलेले एक वाक्य या क्षणी मनी रुंजी घालत आहे –
माणसाने समुद्रासारखे असावे भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही. निसर्ग बहुअंगाने शिकवत असतो. फक्त समजून घेण्याची दृष्टी हवी!

pratibha.saraph@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Recent Posts

भारताने पाकिस्तानच्या फेक नरेटिव्हचा बुरखा फाडला

नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…

8 minutes ago

पाकिस्तानचा खासदार घाबरला; संसदेत ढसाढसा रडला!

एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…

31 minutes ago

भारताच्या हल्ल्यात मारला गेला जैश – ए – मोहम्मदचा कमांडर रउफ असगर, भारतीय विमान अपहरणाचा होता सूत्रधार

इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…

2 hours ago

रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त; भारताच्या ड्रोन हल्ल्याने पाकिस्तान हादरला!

पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…

3 hours ago

Mumbai Rain Update: मुंबईकरांना अवकाळी पाऊसाने झोडपले, ‘या’ भागात यलो अलर्ट

मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…

3 hours ago

१६ वर्षांपूर्वीचा बॉम्बस्फोट, पण अजूनही निकाल नाही!

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…

3 hours ago