बंगळुरु : चांद्रयान-३ ची (Chandrayaan 3) मोहिम यशस्वी करुन इस्रोने (ISRO)भारताची मान अख्ख्या जगभरात उंचावली आहे. इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा, असा हा क्षण आहे. याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी बंगळुरु येथील इस्रोच्या मुख्यालयात जाऊन शास्त्रज्ञांच्या चमूचे अभिनंदन केले व आपल्या भाषणात तीन महत्त्वाच्या घोषणा देखील केल्या. त्यापैकी एक म्हणजे विक्रम लँडर (Vikram Lander) चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला ‘शिवशक्ती’ (Shivshkati) असे नाव देण्यात आले आहे. यावर आता इस्रोच्या शास्त्रज्ञांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांनी दिलेल्या कौतुकाच्या थापेमुळे भविष्यातील मोहिमा यशस्वी करण्याचे बळ मिळाले आहे, अशी भावना शास्त्रज्ञांची होती.
“चांद्रयान -३ ज्या जागेवर लँड झालं त्या जागेचं नाव शिवशक्ती देणं हा समानतेचा देखील संदेश आहे”, अशी प्रतिक्रिया इस्रोने दिली आहे. इस्रो प्रमुख एस. सोमनाथ (S. Somnath) यांनी म्हटलं की, “पंतप्रधानांच्या येण्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ च्या लँडिंगमुळे भारताने इतिहास रचला. यामुळे पंतप्रधान मोदी भावूक झाले होते. त्याचं भाषण हे आमच्यासाठी प्रेरणादायी होतं. तसेच या लँडिंग पॉईंटचं नाव ‘शिवशक्ती’ ठेवल्यामुळे देशभरातील महिलांचं योगदान देखील यामुळे लोकांना कळणार आहे.”
इस्रोच्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ वृंदा व्ही (Vrinda V.) यांनी म्हटलं की, “नारी शक्ती आणि इस्रोच्या महिला शास्त्रज्ञांसाठी हा आनंदाचा क्षण आहे, कारण पंतप्रधान मोदी यांनी लँडिंग साईटला ‘शिवशक्ती’ असं नाव दिले आहे. ज्यामुळे देशभरातील महिलांना प्रोत्साहन मिळणार आहे.” इस्रोचे शास्त्रज्ञ मुथू सेल्वी (Muthu Selvi) म्हणाले की, “पंतप्रधान मोदींच्या भाषणामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. आपण सशक्त आहोत, पण आपण देशातील इतर महिलांनाही सशक्त केले पाहिजे जेणेकरुन त्या त्यांची स्वप्ने पूर्ण करु शकतील.”
काय आहेत पंतप्रधानांच्या तीन घोषणा?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. चांद्रयान-३ ज्या ठिकाणी लँड झालं ती जागा आता ‘शिवशक्ती’ या नावाने ओळखली जाणार आहे. तसेच २०१९ मध्ये चांद्रयान-२ ज्या ठिकाणी क्रॅश झालं त्या जागेचं नाव ‘तिरंगा’ ठेवण्यात आलं आहे. तसेच २३ ऑगस्ट हा दिवस आता ‘राष्ट्रीय अवकाश दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…