कार्यक्रम घडवणारी ‘अनुश्री’

Share

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

साधे पाहुणे आपल्या घरी आले, तर घर आवरण्यापासून ते त्यांना जेवण वाढेपर्यंत किती गडबड-गोंधळ होतो, याचा आपल्या प्रत्येकाला अनुभव आहे. ती मात्र शेकडो लोकांना एकत्र आणते, स्पर्धा घेते, त्यांचं मनोरंजन करते. त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचं आयोजन देखील करते. त्यात जर सेलेब्रिटीला निमंत्रित करायचं असेल, तर तेदेखील करते. इतकं सगळं करून कुठेही गडबड-गोंधळ नसतो. सगळं अगदी शिस्तबद्ध आणि शांततेत सुरू असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एवढी व्यावसायिकता जपून देखील एक प्रकारची आत्मियता आणि आपुलकी त्या कार्यक्रमात असते. आपलेपणाचं संचित घेऊन, त्या कार्यक्रमाच्या आठवणी हृदयाशी जपत प्रत्येकजण आपापल्या घरी परतलेला असतो. ही किमया करत ‘विवेना इव्हेंट्स’ची सर्वेसर्वा अनुश्री कुलकर्णी-जोशी.

अनुश्रीचा जन्म रांगड्या मातीतला म्हणजेच शाहू महाराजांच्या कोल्हापुरातला. तिचे आजोबा त्यावेळेस कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य होते. पहिलं बाळंतपण हे माहेरी असल्याने अनुश्रीचा जन्मसुद्धा आजोळी झाला. अनुश्रीची आई सरिता कुलकर्णी या गृहिणी. मात्र त्या पाककलेत वाकबगार आहेत. जेवढं पाककलेवर प्रभुत्व तेवढंच लिखाणावर सुद्धा. अनुश्रीचे बाबा श्रीकांत कुलकर्णी हे महिंद्रामध्ये ३९ वर्षे कर विभागात कार्यरत होते. त्या विभागाचे ते उपाध्यक्ष होते. अनुश्रीला एकच भाऊ अनुप. जो सध्या हॉलिवूडमध्ये सिनेमॅटोग्राफर आहे.

अनुश्रीची पहिली पाच वर्षे मुलुंडमध्ये गेली. त्यानंतर ती ठाणेकर झाली ते आजपावेतो ठाणेकरच आहे. ठाणा कॉलेजमधून तिने पदवी प्राप्त केली, तर सेंट झेव्हियर्समधून जनमाध्यम आणि पत्रकारितेचे धडे गिरवले. सोबतच बेकरी कोर्स देखील केला. केकच्या रेसिपीजचे पुस्तक सुद्धा अनुश्रीने लिहिले आहे. दिग्दर्शन विषयाचे धडे तिने कार्यशालेत गिरवले आहेत. अनुश्री झी मराठीमध्ये सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम करत होती. कलाकारांना भेटणं, त्यांना सीन समजावून सांगणं. अशा गोष्टी तिला आवडू लागल्या. दरम्यान तिचं लग्न झालं. लग्नानंतर सुद्धा ती केटरिंगचे ऑर्डर्स घायची. केक बनवायची. छोटे-मोठे इव्हेंट्स करायची.

२७ फेब्रुवारी २०१० ला अनुश्रीने इव्हेंट कंपनी सुरू केली. ‘विवेना क्रिएशन्स’ हे तिच्या कंपनीचं नाव. मॅरॅथॉन, एग्झिबिशन, फॅशन शो, पुरस्कार सोहळा, कॉर्पोरेट इवेंट्स, कॉर्पोरेट गिफ्टिंगची कामे सुद्धा अनुश्रीची कंपनी करते. घर सांभाळून, मुलांना सांभाळून करताना व्यवसाय करताना अनेक आव्हाने आली. पण अनुश्रीचे आई, बाबा नेहमीच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे कितीही संकटे आली तरी त्याला अनुश्री तोंड देऊ शकते. त्यांच्या बरोबरीने अनुश्रीला तिच्या मुलांची देखील तितकीच भरभक्कम साथ आहे. अनुश्रीला ३ मुले आहेत. मोठी मुलगी स्वरा चौथीमध्ये शिकत आहे. आलाप आणि अंतरा जुळी अपत्ये असून दोघेही तिसरीमध्ये शिकत आहेत. अनुश्री थकून आल्यावर ती गोंडस मुले तिला घरात मदत पण करतात.

१९ ऑगस्टला मंगळागौर डान्स स्पर्धा झाली. यामध्ये २७५ महिलांनी सहभाग घेतला होता. अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वी असा हा कार्यक्रम होता. वेडिंग एक्पो, सारी रन, लहान मुलांचे शोज हे विवेनाचे भविष्यातील कार्यक्रम आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान हे कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा अनुश्रीचा मानस आहे. कार्यक्रम यशस्वी झाला की, लोकांचे अभिनंदन करणारे फोन येतात, सोशल मीडियावर मेसेज येतात. तो आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो असे अनुश्री सांगते. “लेडी बॉस म्हणजे डोळ्यांसमोर कठोर आणि ओरडणारी बाई येते. पण तशी न येता आयुष्यात कुठल्याही प्रकारचे संकट किंवा आव्हान आले तरी ठामपणे उभं राहून जगाला सिद्ध करून दाखवून देणारी आताची स्त्री आहे. माझ्या मते तीच खरी ‘लेडी बॉस’ आहे” असे अनुश्री म्हणते. इव्हेंट्सच्या माध्यमातून लोकांना अविस्मरणीय आठवणींची भेट देणारी अनुश्री कुलकर्णी-जोशी इव्हेंट्स क्षेत्रातील खरी ‘लेडी बॉस’ आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

भारताच्या हल्ल्यात मारला गेला जैश – ए – मोहम्मदचा कमांडर रउफ असगर, भारतीय विमान अपहरणाचा होता सूत्रधार

इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…

42 minutes ago

रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त; भारताच्या ड्रोन हल्ल्याने पाकिस्तान हादरला!

पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…

2 hours ago

Mumbai Rain Update: मुंबईकरांना अवकाळी पाऊसाने झोडपले, ‘या’ भागात यलो अलर्ट

मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…

2 hours ago

१६ वर्षांपूर्वीचा बॉम्बस्फोट, पण अजूनही निकाल नाही!

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…

2 hours ago

नालेसफाई नव्हे, ही तर भ्रष्टसफाई! पालकमंत्री आशिष शेलार यांचा थेट हल्ला

मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट…

3 hours ago

‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरुच! दहापट उत्तर देणार, पाकिस्तानची घाबरगुंडी, केंद्राची सर्वपक्षीय ताकद एकवटली

नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र…

3 hours ago