चांद्रयान-३च्या लँडींगमुळे देशभर उत्साह, आनंदाचे वातावरण असताना आयर्लंडमध्ये टी-२० मालिका खेळत असलेल्या भारतीय संघानेही इस्त्रोच्या या मोहिमेचे जल्लोषात स्वागत केले. टीम इंडियाच्या या जल्लोषाचा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
ऐतिहासिक अशा चांद्रयान-३च्या लँडींगमुळे बुधवारी देशभर उत्साहाचे वातावरण होते. जगाचेही या मोहिमेकडे लक्ष होते. हे लँडींग करोडो भारतीयांसह जगभरातील असंख्य लोकांनी पाहिले. भारतीय संघही हे लँडींग पाहण्यासाठी एकत्र जमला होता. लँडींग पाहण्याकरिता भारतीय संघासाठी यावेळी खास व्यवस्था करण्यात आली होती. भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह, प्रशिक्षक सितांशू कोटक आणि अन्य खेळाडू यावेळी एकत्रित जमले होते. त्यांनी हा ऐतिहासिक क्षण डोळ्यांत साठवून ठेवला. त्यानंतर भारतीय खेळाडू हे सामन्याच्या तयारीला लागले.
बुधवारी भारत आणि यजमान आयर्लंड यांच्यात टी-२० मालिकेतील शेवटचा सामना होणार होता. या सामन्याआधी भारतीय संघाने चांद्रयान-३ चे यशस्वी लँडींग पाहिले. बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास चांद्रयान-३ चे लँडीग होणार होते आणि हा ऐतिहासिक क्षण भारतीय संघाने पाहायचा ठरवला. यासाठी भारतीय संघाने खास व्यवस्था केली होती. भारतीय संघाने चांद्रयान-३ चे यशस्वी लँडींग झाल्यावर जोरदार जल्लोषही केला. या भारताच्या जल्लोषाचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला.
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…
पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये रविवार,…
जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर…