Bank Scam : १३ बँकांच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून १,४०० कोटी रुपयांचा घोटाळा!

Share

भ्रष्टाचारप्रकरणी एसबीआय, आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक, ॲक्सिस बँकेसह १३ बँकांच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : मोबाइल टॉवर व अन्य दूरसंचार उद्योगात कार्यरत असलेल्या जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर (GTL Infrastructure) कंपनीने १३ बँकांच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून १,४०० कोटी रुपयांचा घोटाळा (Bank Scam) केल्याप्रकरणी सीबीआयने जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी व १३ बँकांच्या अधिकाऱ्यांविरोधात मुंबईत गुन्हा दाखल केला आहे. या बँक अधिकाऱ्यांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक, ॲक्सिस बँक आदी बँकांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर, याचप्रकरणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानीदेखील छापेमारी केली.

मनोज तिरोडकर या उद्योजकाने २००४ मध्ये जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची स्थापना केली होती. त्यानंतर, देशामध्ये तब्बल २७ हजार ७२९ मोबाइल टॉवरची उभारणी केली आहे. कंपनीने २००४ ते २०११ या कालावधीमध्ये वेळोवेळी कर्ज घेतले. मात्र, कर्जाची नियमित परतफेड न झाल्यामुळे कंपनीने तब्बल ११ हजार २६३ कोटी रुपयांचे कर्ज थकवले होते. २०११ मध्ये कंपनीच्या थकलेल्या कर्जासाठी पुनर्रचनेचा प्रस्ताव पुढे आला होता. मात्र, तो अस्तित्त्वात येऊ शकला नाही. त्यावेळी कंपनीच्या एकूण थकीत कर्जापैकी ७,२०० कोटी रुपयांचे कर्ज या बँकांनी कंपनीच्या समभागांमध्ये रुपांतरित केले, तर ४,०६३ कोटी रुपयांची बाकी कंपनीतर्फे शिल्लक राहिली.

कंपनीने या थकीत कर्जाच्या रकमेचा विनियोग कसा केला, याची तपासणी केली असता कंपनीने आपल्या ओळखीच्या कंपनीतच व्यवहार झाल्याचे दाखवत ते पैसे स्वतःच्याच समुहातील अन्य तीन कंपन्यांत गुंतविल्याचे आढळून आले. दरम्यान, बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वी जानेवारीमध्ये तिरोडकर आणि कंपनीविरोधात सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला होता.

कंपनीचे जे ४,०६३ कोटी रुपयांचे कर्ज थकले होते, ते कर्ज कंपनीने बँकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने मे. एडलवाईज ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला विकले. हे कर्ज केवळ २,३५४ कोटी रुपयांना विकले. तोवर कंपनीच्या पायाभूत सुविधा उपलब्ध होत्या, त्यातही मोठ्या प्रमाणात घसारा (डिप्रीसीएशन) निर्माण झाला होता.

बँकांनीही त्यांना येणे असलेल्या ३,२२४ कोटी रुपयांचे कर्ज याच ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला अवघ्या १,८६७ कोटी रुपयांना विकले. या व्यवहारामुळे बँकांना मोठा तोटा झाल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे.

याखेरीज बँकांनी त्यांच्या कर्जाचे रूपांतर कंपनीच्या समभागांत केले होते. त्याचे प्रमाण ६४ टक्के इतके होते. मात्र, बँकांनी कधीही या समभागांची विक्री केली नाही किंवा कर्जाच्या वसुलीसाठी कोणतीही वसुली प्रक्रिया राबवली नसल्याचा ठपका सीबीआयने ठेवला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

13 minutes ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

26 minutes ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

3 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

3 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

4 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

4 hours ago