नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) उद्या म्हणजेच २२ ऑगस्टला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (south africa tour) जात आहेत. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी १५व्या ब्रिक्स शिखर परिषदेत (brics summit) सहभागी होणार आहेत. ही शिखर परिषद २२ ते २४ ऑगस्ट या दरम्यान असणार आहे. येथे पंतप्रधान मोदी ब्रिक्स नेत्यांसोबत भेटीगाठी घेतील तसेच आर्थिक मदत, खाद्य सुरक्षा आणि संघटनेचा विस्तार या अनेक मुद्द्यांवर चर्चा करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी याआधी २०१८मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. यासोबतच ते द. आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामाफोसा याची भेट घेतील. २०१९ नंतर हे पहिल्यांदा घडणार जेव्हा सर्व नेते व्यक्तिगतपणे भेटी घेतील.
पंतप्रधान मोदी आर्थिक सहयोग, खाद्य सुरक्षा आणि ब्रिक्सच्या विस्तार या संबंधित मुद्द्यावरील चर्चेत भाग घेतील. पंतप्रधान मोदी शिखर परिषदेत सदस्य देशांना एक दुसऱ्यांच्या सुरक्षा हितांचा सन्मान करणे आणि दहशतवादाविरोधात एकजूट होण्यासाठी अपील करू शकतात.
२०१९ नंतर हे पहिल्यांदा घडणार आहे की जेव्हा ब्रिक्स शिखर परिषदेत ५०हून अधिक देशांचे नेता सामील होतील. यात दक्षिण आफ्रिकाचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा, चीनचे शी जिनपिंग, ब्राझीलचे लुईज लूला दा सिल्वा आणि मोदी यांचा समावेश होण्याची आशा आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन या परिषदेत ऑनलाईन पद्धतीने सहभागी होतील.
पंतप्रधान मोदी बिझनेस फोरमला संबंधित करतील. जेव्हा ब्रिक्सचे महत्त्व सांगितले जाईल.बाली जी २० परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आमनेसामने असतील.
ब्रिक्सकडे जगातील ४१.५ टक्के लोकसंख्या आहे. तर या ग्रुपकडे जगातील ३२ टक्क्याहून अधिक इकॉनॉमीचा शेअर आहे. या शिवाय ग्रुपजवळ ३.२१ बिलियन लोकसंख्या आहे.
पंतप्रधान तेथून २५ ऑगस्टला यूनान(greece)पोहोचतील. क्वात्रा यांनी सांगितले की १९८३ नंतर भारताच्या कोणत्याही पंतप्रधानांची ही यूनानचा पहिला दौरा आहे. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अथेन्सचा राजकीय दौरा केला होता. पंतप्रधान मोदी यांचा हा अधिकृत दौरा यूनानचे पंतप्रधान यांनी निमंत्रण पाठवल्यानंतर होत आहे.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…