नवी दिल्ली : भारत (India) हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे अनेकविध भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात. मराठी, हिंदी, पंजाबी, नेपाळी, तेलगू, बंगाली यासारख्या अनेक भाषा बोलल्या जातात. मात्र, प्रत्येकालाच प्रत्येक भाषा येते असं नाही. अशावेळी भाषांमध्ये अडथळे येऊ नयेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एआय (AI) आधारित ‘भाषिणी’ (Bhashini) प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. शनिवारी जी २० (G20) डिजिटल इकोनॉमी मंत्र्याच्या बैठकीला संबोधित करताना ही घोषणा त्यांनी केली आहे.
भाषिणी हे AI वर आधारित भारताने विकसित केलेले अनुवाद करणारे प्लॅटफॉर्म आहे. डिजिटल इंडियाच्या (Digital India) दृष्टीने ही एक यशस्वी वाटचाल आहे. सध्या जगभरामध्ये AI चा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरुवात झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. पुढे ते म्हणाले, विविधतेने नटलेल्या भारत देशात अनेक जाती धर्मांचे लोक खूप आनंदात एकोप्याने राहतात. तसेच येथे अनेक भाषा बोलल्या जातात. AI वर आधारित भाषिणी टूल हे भाषांमधील अडथळा दूर करण्याचे काम करणार आहे. भाषिणीचे मुख्य उद्दिष्ट हे विविध भारतीय भाषांमधील अडथळे दूर करण्याचे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. यात डिजिटल अर्थव्यवस्था ही अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. डिजिटल पेमेंट करण्यात भारत सर्वात आघाडीवर आहे. देशातील सर्व सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्त्याच्या खात्यावर जमा होतो, ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा घालण्यास मदत होते. तसेच यामुळे ३३ बिलियनहून अधिक पैशांची बचत झाली आहे, असं पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, UIDAI ने विकसित केलेले आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशन व्यवहारांची संख्या सतत वाढत आहे. लाभार्थी ओळखण्यासाठी, बँक खाती उघडण्यासाठी आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनचा वापर केला जात आहे. डिजिटल इंडिया अंतर्गत सरकारने सुरू केलेली जनधन, आधार आणि मोबाइल (JAM trinity) या संकल्पना देखील अधिक फायदेशीर ठरत आहेत. २०१५ साली आम्ही डिजिटल इंडियाची सुरुवात केली आहे आणि या गेल्या नऊ वर्षात भारतात डिजिटल क्रांती झाली आहे. यूपीआयद्वारे (UPI) १० अब्ज रुपयांची देवाणघेवाण महिन्याला होते, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…