मुंबई : वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये चिकनच्या डिशमध्ये उंदराचे मांस आढळुन आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी मॅनेजर व्हिव्हियन अल्बर्ट शिक्वेरा (वय ४० वर्षे) आणि संबंधित हॉटेलचे आचारी त्याचबरोबर चिकनचा पुरवठा करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी अनुराग सिंग (वय ४०) हे त्यांचा मित्र अमित यांच्यासोबत वांद्रे पश्चिम येथील पाली नाका येथील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यांनी रोटीसोबत चिकन आणि मटण थाळीची ऑर्डर दिली.
जेवताना त्यांना त्यामध्ये एक मांसाचा तुकडा समोर आला जो वेगळा दिसत होता. यानंतर प्लेटमध्ये निरखून पाहिले असता आणि जवळून तपासणी केल्यावर तो उंदराच्या मांसाचा तुकडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे पाहून अनुराग सिंग आणि अमित यांना धक्का बसला.
यानंतर अनुराग सिंग यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…