नवी दिल्ली : राज्याच्या काही भागात पावसाने उसंती घेतली असली तरी देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain Updates) सुरूच आहे. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, आज राजधानी दिल्लीत काहीसा तुरळक पाऊस असेल. मात्र, १३ आणि १४ ऑगस्ट रोजी दिल्लीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तर उत्तराखंडमधील सहा जिल्ह्यांमध्ये पावसामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. डेहराडूनमध्ये १२ ते १४ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बिहारमधील ९ जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गुजरात, विदर्भ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगाल, ओडिशा, तेलंगणा, महाराष्ट्रातील कोकण विभाग, गोवा, किनारी कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये १५ ऑगस्टनंतर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मध्य प्रदेशात येत्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र १५ ऑगस्टनंतरच राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होईल, असा विश्वास हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
या कालावधीत हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये १५ ऑगस्टपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये रविवारी पाऊस पडू शकतो. तर, पश्चिम उत्तर प्रदेशात १३ आणि १४ ऑगस्टला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेशात शुक्रवार ते रविवार आणि जम्मूमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील सात दिवसांत उर्वरित वायव्य भारतात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूर्व भारतात रविवारपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. बिहार, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम सारख्या भागांत पावसाची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी पश्चिम बंगालमध्ये पावसाची शक्यता आहे. तर झारखंडमध्ये पुढील चार दिवस पावसाची शक्यता नाही.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…