नवी मुंबई (प्रतिनिधी) : मुसळधार पावसामुळे सिडकोच्या वतीने तळोजा फेज – १/२ मधील डांबरीकरण केलेल्या रस्त्यांवरील डांबराच्या थराची झालेली झीज आणि महानगर गॅस कंपनी व विद्युत विभागाकडून, रस्त्यांचे करण्यात आलेले खोदकाम नव्याने दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे सिडकोचे कार्यकारी अभियंता (तळोजा) मिलिंद म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.
सिडकोकडून पावसाळ्यापूर्वी तळोजा फेज -१/२ मधील रस्त्यांचे डांबरीकरण पावसात वाहून गेले त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पडलेले खड्डे दुरुस्ती आणि रस्त्यांचे नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या मे. पी.पी. खारपाटील यांची सखोल चौकशी करण्याची मागणी पंचनंद नगर रहिवाशी सामजिक संस्थेचे अध्यक्ष कासम मुलाणी यांनी केली होती. सिडकोकडून तळोजा फेज -१ मधील ९६,९०० वर्ग मीटर रस्त्यांचे डांबरीकरण तसेच फेज -२ मधील ९२,७०० वर्ग मीटर रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे काम मे. पी.पी. खारपाटील कन्ट्रक्शन कंपनीला काम देण्यात आले आहे. ऑक्टोबर -२०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचा कालावधी आहे.
सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस जून महिन्यात तळोजा परीसरात १,४३३ मिमी. पडल्याची नोंद झाली आहे. या पावसात फेज- १ मधील एकूण डांबरीकरण करण्यात आलेल्या रस्त्यापैकी १ टक्का आणि फेज -२ एकूण कामांपैकी २.७५ टक्के रस्त्याच्या पृष्ठ भागाची (डांबराच्या ३० मिमी. थर) झीज झाल्याचे आढळून आले. तसेच महानगर गॅस कंपनीचे पाइप लाइन टाकण्याचे काम आणि विद्युत विभागाकडून गृहनिर्माण प्रकल्पातील विद्युत केबल टाकण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. सदर कामे पूर्ण झाल्यानंतर तत्काळ नव्याने दुरूस्ती करण्यात आली. परंतु सतत पडत असलेल्या पावसामुळे डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर दोषदायित्व कालावधी ३ वर्षाचा असल्याने पाऊस कमी झाल्यानंतर तत्काळ रस्त्यांचे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल असे, मिलिंद म्हात्रे यांनी मुलाणी यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…
मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट…
नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र…
पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने नष्ट देशभरात मॉकड्रील करण्यापूर्वीच भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय. पाकिस्तान झोपेतून…
नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये २६ नागरिकांची हत्या केली. नंतर…