मुंबई (प्रतिनिधी) : कलारंजना मुंबई निर्मित, उदय साटम संकल्पित-दिग्दर्शित ‘मराठी पाऊल पडते पुढे’ कार्यक्रमाचा ४०००वा प्रयोग व कलारंजना संस्थेचा ३२ वा वर्धापनदिन दामोदर हॉल परेल येथे रविवारी मोठ्या दिमाखात पार पडला. महाराष्ट्राच्या महान संस्कृतीचा महाकलाविष्कार पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांसह विविध मान्यवरांनी कार्यक्रमाला गर्दी केली होती. आजी माजी ७०हून अधिक कलाकारांच्या संचात पार पडलेल्या मराठी पाऊल पडते पुढे कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी कलारंजना संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवर व कार्यक्रमातील आजी-माजी कलाकारांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी सिनेअभिनेते सुशांत शेलार, पार्श्वगायक नंदेश उमप आदी मान्यवर उपस्थित होते.
‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी ऑर्केस्ट्रामधून पुढे आलेला कलाकार आहे हे सांगताना अभिमान वाटतोय. माझ्यासारख्या अनेक कलाकारांना या कार्यक्रमाने घडवले आहे. त्यामुळे जितके आभार मानावे तितके थोडेच, अशी प्रतिक्रिया अभिनेते सुशांत शेलार यांनी व्यक्त केली.
पार्श्वगायक नंदेश उमप म्हणाले की, निर्माता होणे ही बाब सोपी नाही, कारण निर्मात्यांच्या अडचणी काय असतात हे मी देखील अनुभवतोय. कलाकारांच्या अनेक पिढ्या घडवण्याचे काम उदय साटम यांच्या कलारंजना या संस्थेने केले आहे. या रंगमंचाने आम्हा सर्वांनाच भरभरून दिले आहे.
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…
पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये रविवार,…
जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर…