छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधीवाटपावरून आज शिवसेना व ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये चांगलीच जूंपली. ठाकरे गटाच्या आमदाराला निधी मिळत नसल्याचा कांगावा करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री संदिपान भुमरे व अब्दुल सत्तार हे हमरीतुमरीवर आल्याचे पाहायला मिळाले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावरुन मंत्री संदीपान भुमरे यांनी आणि अब्दुल सत्तार यांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख केल्याने शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार राजपूत यांच्या मदतीला धावून आले आणि मंत्री भुमरे आणि सत्तार यांना सुनावले. यावरुन थेट हमरीतुमरी सुरु झाली आणि हा वाद थेट एकमेकांच्या अंगावर जाण्यापर्यंत पोहोचला असल्याचे समोर आले.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…
पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये रविवार,…
जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात आज पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…