मुंबई : ठाकरे गटाच्या चिंतेत भरच पडत चालली आहे. ठाकरे गटाच्या मोठमोठ्या नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. आता ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आग्रीपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्यांच्यासह महापालिकेच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. बॉडी बॅग (Body Bag) खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.
मुंबई महापालिकेने कोरोना काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. यात टेंडर प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्यात किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग होता, असं ईडीचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांची चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच आता किशोरी पेडणेकर यांच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या. ईडीच्या सूचनेनुसार मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग १,५०० रुपयांऐवजी ६८०० रुपयांना तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच ईडीने २१ जून रोजी राज्यभर छापे मारले होते. या छाप्यात ६८ लाख ६५ हजार रुपये रोकड, १५० कोटींची स्थावर मालमत्ता सील करण्यात आली होती. या शिवाय १५ कोटींची एफडी आणि इतर गुंतवणूकही ईडीला आढळली होती. २१ जूनला ईडीने मारलेल्या छापात्यात उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण, सुजीत पाटकरसह १० ते १५ जणांचा समावेश होता.
दरम्यान किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार, असं किरीट सोमय्या म्हणाले. “माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात बॉडी बॅग्ज खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. १५०० रुपयांची मृतदेह ठेवण्याची बॉडी बॅग ६७०० रुपयांनी घेतली. मुंबईच्या महापौर, अतिरिक्त आयुक्त आणि वेदांत इनोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्ही या संबंधिची तक्रार मुंबई पोलिसात केली होती. आणखी तीन घोटाळ्यांचा तपास सुरु आहे. यावरही कारवाई होणार आहे. आधी संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर जेलमध्ये गेले होते, आता किशोरी पेडणेकर आणि नंतर आणखी तीन नेते जेलमध्ये जाणार, असं किरीट सोमय्या म्हणाले.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…