बिहार : पाटणा येथे विरोधी पक्षांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी आपल्या एकजुटीचे नाव ‘इंडिया’ (I.N.D.I.A) असे ठेवले आहे. यावर सत्ताधार्यांनी मात्र टीकास्त्र उपसले आहे. हे नाव ठेवल्यापासून त्यावर अनेकदा आक्षेप घेतला गेला आहे. आज बिहारमध्ये एनडीएच्या (NDA) खासदारांच्या बोलावण्यात आलेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) पुन्हा एकदा या नावावर टीका करत विरोधकांच्या एकजुटीचे नवे नामकरण केले आहे. हे ‘इंडिया’ नाही तर ‘घमंडिया’ आहे, असा जोरदार हल्ला पंतप्रधान मोदींनी केला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, विरोधकांची जी नवी आघाडी आहे ती आघाडी म्हणजे इंडिया नाही तर घमंडिया आहे. युपीए हे नाव बदनाम झालं होतं म्हणून आता विरोधकांनी इंडिया हे नाव घेतलं आहे, अशी टीका मोदींनी केली. यावेळेस मोदींनी नितीश कुमारांवरही (Nitish Kumar) टीका केली. ते म्हणाले, भाजपाने नितीश कुमार यांना तीन वेळा मुख्यमंत्री पद दिलं. या निवडणुकीच्या वेळी त्यांच्या जागा कमी झाल्या होत्या तरीही त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिली. एनडीएकडे त्याग भावना आहे आणि एनडीएच स्थिर सरकार देऊ शकते. एनडीएची साथ ज्यांनी सोडली ते सगळे स्वार्थी आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
‘इंडिया’ या नावाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका (PIL) देखील दाखल करण्यात आली आहे. गिरीश भारद्वाज या कार्यकर्त्याने वकील वैभव सिंह यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विधानांचा हवाला दिला आहे. ते म्हणाले की, या नेत्यांनी त्यांच्या आघाडीचे नाव आपल्या राष्ट्राचे नाव म्हणून प्रस्तुत केले आहे आणि एनडीए/भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्याच राष्ट्रासोबत संघर्षात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच या याचिकेत म्हटले आहे की, राहुल गांधींच्या विधानामुळे सामान्य लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की, आगामी निवडणुका राष्ट्रीय आघाडी (NDA) आणि ‘देश’ म्हणजेच इंडिया यांच्यातच लढल्या जातील. तसेच, यासंदर्भात भारतीय निवडणूक आयोगाकडे (ECI) तक्रार देखील केली होती, परंतु निवडणूक आयोगाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, असे याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितले आहे. या प्रकरणी आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते.
श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…