Nitin Desai: नितीन देसाईंच्या ‘त्या’ ऑडिओ क्लीप्समध्ये महत्त्वाची माहिती ?PM मोदी आणि CM शिंदेंसाठी मेसेज

Share

ऑडिओ क्लीप्समुळे नितीन देसाईंच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार आहे.

चित्रपटसृष्टीतील सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई(Nitin Desai) यांनी बुधवारी पहाटे कर्जत येथील एन.डी. स्टुडिओत गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यांच्या या धक्कादायक एक्झिटमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. खालापूर पोलिसांनी एन.डी. स्टुडिओतील नितीन देसाई यांचा मृतदेह खाली उतरवल्यानंतर तातडीने तपासाला सुरुवात केली होती. यावेळी पोलिसांना नितीन देसाई यांच्या मृतदेहाजवळ एक व्हॉईस रेकॉर्डर मिळाला होता. हा व्हॉईस रेकॉर्डरच नितीन देसाई आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीतील महत्त्वाचा दुवा ठरण्याची शक्यता आहे. या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये नितीन देसाई यांनी कुटुंबातील व्यक्तींबरोबरच आपल्या वकिलासाठी एक मेसेज रेकॉर्ड करुन ठेवला होता. व्हॉईस रेकॉर्डरमध्ये एकूण ११ ऑडिओ क्लीप्स आहेत. त्यापैकी एका ऑडिओ क्लीपमध्ये नितीन देसाई यांनी त्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या गोष्टींविषयी महत्त्वाचा खुलासा केला आहे. ‘लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार’ हे व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड केलेले पहिले वाक्य आहे.

यासोबतच नितीन देसाई(Nitin Desai) यांनी एका क्लीपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख करत त्यांच्याकडे एक विनंती केली आहे. एन.डी.स्टुडिओ कोणत्याही बँकेच्या ताब्यात जाऊ देऊ नका. राज्य शासनाने या एनडी स्टुडिओचा ताबा घेऊन कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी एक भव्य कलामंच उभारावं अशी माझी इच्छा आहे. मराठी, हिंदी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनानं पुढाकार घ्यावा. कारण एन.डी.स्टुडिओ हे नितिन देसाई म्हणून नाही तर एका मराठी माणसाने उभं केलेलं मोठं कलामंच आहे. आपण ज्या कंपनीकडून कर्ज घेतले होते, त्यांच्याकडून फसवणूक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप नितीन देसाई यांनी केला. तसेच कर्ज देणाऱ्या संस्थांकडे एनडी स्टुडिओचा ताबा देऊ नये. हा स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा, यासाठी नितीन देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या मागण्यांसंदर्भात काय पावलं उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

नितीन देसाईंना कामं मिळू नये यामध्ये होता बड्या बॉलिवूड अभिनेत्याचा हात? विरोधात होती एक मोठी लॉबी?

नितीन देसाईंच्या आत्महत्येसाठी कोण जबाबदार?

विधानसभेत गुरुवारी नितीन देसाई यांच्या मृत्यूप्रकरणाबाबत चर्चा झाली. यावेळी सर्वपक्षीय राजकारण्यांनी एकत्र येत नितीन देसाई यांना न्याय देण्याची मागणी केली. नितीन देसाई यांनी एन.डी. स्टुडिओच्या ४३ एकर जमिनीवर १८० कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. या १८० कोटी रुपयांचे २५२ कोटी झाले. एडलवाईज समूहाचे सीईओ रसेश शहा यांच्या असेट रिक्रेशन कंपनीचे हे पहिले प्रकरण नाही. ही आधुनिक सावकारी आहे. असेट रिक्रेशन कंपनीने नितीन देसाई यांना दिलेल्या कर्जावर आकारलेल्या व्याजाचा दर आणि पद्धत याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

12 minutes ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

19 minutes ago

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

26 minutes ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

40 minutes ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

53 minutes ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

3 hours ago