आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात सर्वात कमी वयात घेतल्या ५ विकेट्स
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिघात फिलिपिन्सच्या संघाचा दबदबा नसला त्यांच्या एका गोलंदाजाने लक्ष वेधून घेतले. आयसीसी पुरूष टी२० वर्ल्डकप पूर्व आशिया – पॅसिफिक पात्रता फेरीत फिलिपिन्सचा १६ वर्षांचा वेगवान गोलंदाज केपलग लुकीजने ५ विकेट घेतले. आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात सर्वात कमी वयात ५ विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम(World record) केपलगने आपल्या नावे केला आहे.
१६ वर्षे आणि १४५ दिवस वयाच्या लुकीजने या सामन्यात ५ विकेट्स घेत इतिहास रचला. ९४ धावा वाचवण्यासाठी मैदानात उतरलेल्या फिलिपिन्सच्या १६ वर्षांच्या या वेगवान गोलंदाजाने नव्या चेंडूवर वानुअतूच्या फलंदाजांची चांगलीच भंबेरी उडवली.
लुकीजला त्याची पहिली विकेट ही तिसऱ्या षटकात मिळाली. त्याने क्लेमेंट टॉमीला बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात लुकीजने अँड्रमनसेल, रोनाल्ड तारी आणि जोशुआ रासू या तीन विकेट्स घेत प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवली. यानंतर लुकीजने ज्यूनियर कल्टापौला बाद करत पाचवी विकेट घेतली.
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…
मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…
मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट…
नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र…