Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीभिडे गुरुजींविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भिडे गुरुजींविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

साईबाबांविषयी चुकीचे विधान केल्याने शिर्डी ग्रामस्थ आक्रमक

शिर्डी : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी ऊर्फ भिडे गुरुजी यांनी अमरावती येथील एका व्याख्यानात साईबाबांविषयी अतिशय खालच्या पातळीवर शब्दप्रयोग करत देव्हाऱ्यात साईबाबांचा फोटो आणी मुर्ती ठेवू नका असे विधान केल्याने शिर्डी ग्रामस्थ आक्रमक झाले असून भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सर्वपक्षीय शिर्डी ग्रामस्थांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्यानंतर साईसंस्थानच्या वतीने शिर्डी पोलीस ठाण्यात भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मनोहर कुलकर्णी ऊर्फ भिडे गुरुजी यांनी नुकत्याच अमरावती येथील आपल्या व्याख्यानात सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या साईबाबांबद्दल अतिशय खालच्या पातळीवर भाष्य केल्याने शिर्डी ग्रामस्थांसह जगभरातील लाखो करोडो भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहचली आहे.भिडे गुरूजी यांच्या बालिश वक्तव्यावर जाहीर निषेध करण्यासाठी सोमवार दि.३१ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता हनुमान मंदिराजवळ शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांची भेट घेऊन भिडे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली.यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनीही तातडीने त्रिसदस्यीय समितीच्या अध्यक्षांशी फोनवर चर्चा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.यावेळी साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी, साईमंदिर सुरक्षा अधिकारी आणि विधी अधिकारी यांना शिर्डी पोलिस स्टेशनला रवाना केले असता साईमंदीर सुरक्षेचे प्रमुख अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अण्णासाहेब परदेशी यांच्या तक्रारीवरून भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध गुरनं ६९७/२०२३ नुसार भादवी कलम २९५ (अ ), १५३ (अ ),२९८,५०० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच सर्वपक्षीय शिर्डी ग्रामस्थांनी शिर्डी पोलिस स्टेशनचे उपविभागीय पोलिस अधिक्षक संदीप मिटके यांना निवेदन दिले असून भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.यावेळी शिर्डी ग्रामस्थांसह साईभक्तांनी भिडे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढील तपास शिर्डी पोलिस ठाण्याच्या सहा पोलिस निरीक्षक योगीता कोकाटे करत आहे.

– श्री साईबाबा हे आमचे दैवत आहे आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांवर मनोरुग्ण भिडे गुरुजींनी जे वक्तव्य केले आहे त्याचा आम्ही सर्व शिर्डीकर जाहीरपणे निषेध करतो.भिडे गुरुजींनी आपल्या वयाचे भान राखून बोलायला हवे होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर देशात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून भविष्यात भिडे गुरुजींनी साईबाबांबद्दल कोणत्याही प्रकारचे वक्तव्य केले तर शिर्डीकर त्यांना माफ करणार नाही अशी ग्वाही मी देतो. – कैलासबापू कोते, प्रथम नगराध्यक्ष शिर्डी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -