Friday, May 9, 2025
Homeसाप्ताहिककोलाज‘गुड वाईब्स ओन्ली’ आता प्लॅनेट मराठी ओटीटीवर

‘गुड वाईब्स ओन्ली’ आता प्लॅनेट मराठी ओटीटीवर

ऐकलंत का!: दीपक परब

काही दिवसांपूर्वीच ‘गुड वाईब्स ओन्ली’ या बेवफिल्मचे पोस्टर झळकले. पोस्टर पाहून यात काहीतरी भन्नाट आहे, याची कल्पना आली होतीच. त्यात आता भर टाकली आहे या वेबफिल्मच्या ट्रेलरने. नुकतेच या बेवफिल्मचे ट्रेलर प्रदर्शित झाले असून ट्रेलरही अफलातून आहे. श्रवण अजय बने आणि आरती केळकर यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या हलक्याफुलक्या, मनाला आनंद देणाऱ्या वेबफिल्मची कथा आणि दिग्दर्शन जुगल राजा यांचे आहे. सिल्क लाईट फिल्म्स प्रस्तुत या वेबफिल्मचे निर्माते जुगल राजा असून ‘गुड वाईब्स ओन्ली’ प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे.

दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती सर्फिंग कॅम्पच्या निमित्ताने एकत्र येतात. सुरुवातीला सतत खटके उडणाऱ्या या दोघांमध्ये हळूहळू मैत्री निर्माण होताना दिसत आहे. अतिशय सुरेख अशा या मैत्रीत धमाल आहे. भावनिक बंध आहेत. सर्फिंग या वाॅटर स्पोर्टभोवती फिरणाऱ्या या कथेत मैत्रीची एक तरल भावना अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आल्याचे ट्रेलरमध्ये दिसतेय. आरजे श्रवण आणि गायिका आरती केळकर यांनी या वेबफिल्मच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. मैत्री या विषय यापूर्वी अनेकदा हाताळण्यात आला आहे. मात्र एखाद्या खेळातून फुलत जाणारी मैत्री बहुधा पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शकाने खूप छान पद्धताने हा विषय हाताळला आहे आणि मांडला आहे. तरुणाईला हा विषय निश्चितच आवडेल. त्याचबरोबर सर्वच वयोगटाला ही वेबफिल्म आवडणारी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -