भारत आणि बांगलादेश महिला एकदिवसीय मालिका संपली. तरी त्याचा वाद मात्र अजून संपलेला नाही. मीरपूरमधील तिस-या एकदिवसीय सामन्याच्या वेळी अंपायरिंगवरून बराच गदारोळ झाला. त्यानंतर भारतीय संघाला बांगलादेश दौरा संपवावा लागला. अंपायरने दिलेल्या एलबीडब्ल्यू आऊटवरून हा वाद रंगाला होता. त्याची शिक्षा देखील हरमनप्रीला(harmanpreet kaur) मिळाली. या शिक्षेवरून आता बांगलादेशची कर्णधार निगर सुलतानाने(Nigar Sultana) टीका केली आहे. मागील आठवड्यात बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात तिला पंचांनी पायचित बाद केले. पंचांच्या निर्णयाने नाराज झालेल्या हरमनने स्टम्पवर आपला राग काढला. त्यानंतर सामना संपवल्यावरही तिने पंच, सामना अधिकाऱ्यांवर टीका केली होती.
आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी हरमनप्रीत कौरला(harmanpreet kaur) पुढील दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निलंबित करण्यात आले आहे, असे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे. या निलंबनामुळे हरमनप्रीत सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. नाहिदा अख्तरच्या चेंडूवर हरमनप्रीतल पायचित बाद करण्यात आले. पण तो चेंडू तिच्या बॅटला लागला असल्याचा दावा तिने केला. पॅव्हेलियनमध्ये परतण्यापूर्वी तिने आपला राग यष्टींवर काढला. त्यानंतर हरमनने बक्षीस वितरण समारंभात पंचांवर टीका केली. या मालिकेचे संयुक्त विजेते असलेल्या संघांसोबत पंचांनी ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यावे, असेही हरमनने म्हटले होते. असभ्य वर्तनामुळे बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानाने(Nigar Sultana) आपल्या संघासह ते ठिकाण सोडले आणि भारतीय कर्णधाराला शिष्टाचार शिकण्याचा सल्ला दिला.
मागेही एकदा तिने सामन्यानंतर हरमनप्रीतवर टीका केली होती. निगर म्हणाली, ही पूर्णपणे तिची समस्या आहे. याच्याशी माझा काहीही संबंध नाही. एक खेळाडू म्हणून ती अधिक चांगली वागणूक दाखवू शकली असती. हरमनप्रीतच्या त्या कृतीवर आयसीसीने घेतलेली अॅक्शन स्वागतार्ह आहे. मात्र, झालेली शिक्षा ही कमी की जास्त यावर फारशी बोलणार नाही. तिने त्यावेळी थोडा आदर दाखवणे आवश्यक होते. झालेली घटना निंदनीय स्वरुपाची आहे.
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…