मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी तानसा आणि विहार तलावही ‘ओव्हरफ्लो’ झाला आहे. विहार तलाव मध्यरात्री १२ वाजता (Vihar lake overflowing) तर तानसा तलाव बुधवारी पहाटे ४.३५ वाजता (Tansa lake overflowing) ‘ओव्हरफ्लो’ झाला. मुंबईला ५० टक्के पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावात मात्र अपेक्षेपेक्षा कमी पाणी आहे.
मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांत झालेल्या चांगल्या पावसामुळे तलावांच्या पाणीपातळीत वाढ झाली असली तरी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अजूनही जलाशयांमध्ये पाणीसाठा कमी आहे. तानसा तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर भिवंडी आणि ठाण्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: या तलावांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
मुंबईत चांगला पाऊस पडत आहे. हवामान खात्याने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर रायगड आणि रत्नागिरी या शेजारील जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दहिसरमध्ये २४ तासांत १०२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहत असल्याने सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…