Friday, May 9, 2025
HomeदेशFlood in Noida : नोएडात जलप्रलय! शेकडो वाहने बुडाली!

Flood in Noida : नोएडात जलप्रलय! शेकडो वाहने बुडाली!

नोएडा : उत्तर प्रदेशातील गंगा आणि यमुना नदीनंतर आता हिंडन नदीला (Hindon River) महापूर आला आहे. पाण्याचा स्तर वाढला असून नदीचे पाणी नोएडातील रस्त्यांवर आल्याने नोएडात पूर सदृश्य (Flood in Noida) स्थिती निर्माण झाली आहे.

मुसळधार पावसामुळे आलेल्या जलप्रलयात नियोजित शहर समजले जाणारे नोएडा मान्सूनच्या (Monsoon) पावसात तग धरण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. येथील एकाच वेळी शेकडो कार पाण्यात बुडाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागला आहे.

हिंडन नदी काठच्या परिसरातील नोएडाच्या इकोटेक ३ जवळचा परिसर पाण्याखाली गेला आहे. सुमारे ५०० वाहने येथे अडकली आहेत. लोकांना रस्त्यावर येणे कठीण झाले आहे.

गौतम बुद्ध नगरचे जिल्हाधिकारी मनीष कुमार वर्मा यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांपासून हिंडन नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. हिंडन बॅरेजमधील धोक्याची पातळी २०५.८ आहे. तर पाटबंधारे विभागाच्या म्हणण्यानुसार सध्या ते २०१.५ इतके आहे. पूर सदृश्य स्थितीमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे.

नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. व्हायरल होत असलेला कार बुडालेला व्हिडीओ हा पूर आलेल्या गावातील आहे. जिथे एका खाजगी कॅब कंपनीच्या प्रांगणात खराब झालेली वाहने उभी होती. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एनडीआरएफची टीम घटनास्थळी तैनात असल्याची माहिती त्यांनी दिली.

वृत्तसंस्था पीटीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनेक कार पाण्यात बुडाल्याचे दिसत आहे. जलप्रलयामुळे कारचा वरील केवळ टपाचा भाग दिसत आहे. या ठिकाणी पोलिसही जवळपास तैनात असल्याचे दिसून आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -