Friday, May 9, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRain Updates : मुंबईत विक्रमी पाऊस

Rain Updates : मुंबईत विक्रमी पाऊस

मुंबई : मुंबईसह ठाणे, कल्याण, वसई-विरार, पालघर या भागांमध्ये मागील २४ तासांमध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सांताक्रूझ वेधशाळेने मुंबईसह उपनगरात २०४ मिमी पाऊस बरसला असल्याची नोंद केली आहे. या वर्षातील ही सर्वाधिक पावसाची नोंद आहे. तर मागील नऊ वर्षात तिसऱ्यांदा जुलै महिन्यात २४ तासांमध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई आणि परिसरात अद्यापही पावसाची संततधार सुरु आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे.

या आधी मुंबईसह उपनगरांमध्ये दोन वेळा जुलै महिन्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पहिल्यांदा २ जुलै २०१९ रोजी ३७५.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर १६ जुलै २०२१ रोजी ४ तासांत २५३.३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. तसेच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरणांतील पाणीसाठा ४२.७५ टक्क्यांवरुन ४७.५ टक्क्यांपर्यंत वाढला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या ठाणे वेधशाळेने मुंबईसह पालघरला अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईला हवामान विभागने यलो अलर्ट तर पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर वसईमध्ये सखल भागामध्ये पाणी साचले होते. तर जलसाठा कायम होता. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी देखील अडचण निर्माण झाली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -