नाशिक: नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर येथील प्रकरणांबाबत एसआयटीकडून एका महिन्यात रिपोर्ट मागण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.
गेल्या आठवडाभरापासून पावसाळी अधिवेशन असून आजपासून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwer Mandir) प्रवेश प्रकरणांवर भाष्य केले. ते म्हणाले की, अशा प्रकारची परंपरा आहे का? हा वाद अजून सुरू आहे. कोणीतरी येतं आणि अशी घटना घडवतं. ते ही मिरवणूक थेट आतमध्ये घेऊन गेले. या ठिकाणी सेल्फी आणि फोटो काढण्यात आले. हा प्रकार आमच्या भावना दुखावणारा आहे. दोन्ही बाजूंची बैठक झाली. त्यामध्ये संबंधित समुदायाने माफी मागितली आहे. जे लोक त्या ठिकाणी होते, त्यांना नोटीस देण्यात आली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणताही धर्म श्रध्दा पाळण्यास शासन आडवं येणार नाही. एखाद्या ठिकाणी परंपरेच्या आड काही खोडसाळ पणा होत असेल तर आम्ही सहन करणार नाही. ठराविक समुदायाने केलेल्या कृत्यामुळे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होते. ते योग्य नाही जिथे श्रध्दा सर्व समावेशक असते. तिथे शासन त्यांच्या पाठीशी आहे. या संपूर्ण प्रकरणात त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ट्रस्टीने केलेल्या तक्रारीचे नोंद घेणं सरकारचं काम आहे. नागपूरमधील दर्ग्याच्या विकासासाठी मी स्वत: पैसे दिले. पण एखादा म्हणत असेल, मशिदीसमोर जाऊन आम्हाला नाचायचं आहे, हे योग्य नाही. सर्वानी एकमेकांच्या धर्माचा आदर केला पाहिजे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश प्रकरण झाले, त्यावेळी एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तसेच या घटनेच्या चौकशीसाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्यात आली होती. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, असेही सांगण्यात आले होते. त्यावर आज पावसाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीकडून या प्रकरणात एका महिन्यात रिपोर्ट मागण्यात येणार असल्याचे सांगितले.
श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…