मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shide) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे कष्टाळू मुख्यमंत्री म्हणत कौतुक केले आहे.
एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब पंतप्रधानांची भेट घेतली. याबाबत मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. यासोबत पंतप्रधान मोदी यांनी भेटीसाठी वेळ काढल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदी यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ट्वीट रिट्वीट करत मुख्यमंत्र्यांचा कौतुक केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो ट्वीट करत लिहिलं की, ”देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या मा. नरेंद्र मोदीजी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला.”
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, ”महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे.”
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…