कणकवली : बाळासाहेबांचे विचार केंद्रस्थानी ठेवून चालत असल्याचे सांगणारे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतःच्या मुलामध्ये आणि अन्य शिवसैनिकांमध्ये दुजाभाव करतात. याबाबत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंच्या सगळ्याच गैरवर्तणुकीची पोलखोल केली. दुसर्यांना सल्ले देणार्या संजय राऊतांचाही (Sanjay Raut) चांगलाच समाचार घेतला.
आजच्या सामना वृत्तपत्रात ‘आमचा तो बाब्या आणि तुमचा तो कार्टा’ असं वाक्य वापरण्यात आलं. हे वाक्य आधी संजय राजाराम राऊतने स्वतःच्या मालकाला सांगावं. जो नियम तुझ्या मालकाने स्वतःच्या कार्ट्याला लावला तो अन्य कुठल्याही शिवसैनिकाला लावलेला नाही. संजय राठोड यांना एका महिलेच्या प्रकरणात उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला लावला होता. तोच प्रकार आदित्य ठाकरेंच्या बाबतीत झाल्यावर मात्र उद्धव ठाकरेंनी समान नागरी कायदा का वापरला नाही? आदित्य ठाकरेवरदेखील दिशा सालियनच्या हत्येचा आरोप आहे, असे खडेबोल नितेश राणे यांनी सुनावले.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) झोपेत बोलतात या संजय राऊतांच्या वक्तव्यावर नितेश राणेंनी चांगलेच सुनावले. देवेंद्रजी झोपेत बोलत नाहीत तर त्यांनी तुझी आणि तुझ्या मालकाची झोप उडवली आहे. त्यामुळे रोज सकाळी उठून तुम्ही जे नशेत बोलता ते आधी शुद्धीत या, असा इशारा नितेश राणेंनी दिला. मातोश्रीवरील कमी केलेल्या सुरक्षेमुळे तुमची झोप उडाली आणि म्हणून कालचा आदित्य ठाकरेंचा अपघात घडवून आणला असावा, असा माझा थेट संशय आहे, असंही नितेश राणे यावेळी म्हणाले.
बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी पुन्हा एकदा बेईमानी उद्धव ठाकरे यांनी केली. ज्या सेनाभवनला हिंदुत्वाचं मंदिर म्हणून ओळखलं जातं तिथे काल मुस्लिम लॉबवरचे लोक आले, मग बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित असल्याचं सांगणारे आता सेनाभवनचं शुद्धीकरण करणार का? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, शुद्धीकरण जमत नसेल तर सेनाभवनवरील बाळासाहेबांचा फोटो काढून टाका आणि तिथे भोंगे लावा. उगाच मोठमोठ्या बाता करण्यापेक्षा समान नागरी कायदा आधी उबाठा सेनेत आणून दाखवा, असे नितेश राणेंनी खडसावले.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…