सेऊल (वृत्तसंस्था) : बलाढ्य इराणला ३३-२८ असे नमवत भारताने आशियाई कबड्डी चॅम्पियनशीप (Asia Kabbadi Championship) स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. गुरुवारी उपांत्य फेरीचा हा सामना झाला. भारतीय संघाचा हा लागोपाठ चौथा विजय आहे.
भारतीय संघाचा कर्णधार पवन सहरावतने दमदार चढाया मारत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. भारताने जमवलेल्या ३३ पैकी १६ गुण एकट्या पवनने मिळवले. महाराष्ट्राच्या अस्लम इनामदारने सामन्याच्या ११व्या मिनिटाला चढाईत २ गुण मिळवत इराणला ऑलआऊट केले. त्यामुळे भारताने ११-५ अशी आघाडी घेतली. सहरावतच्या अप्रतिम चढायांच्या बळावर पहिल्या हापला चार मिनिटे शिल्लक असताना भारताची आघाडी १७-७ अशी होती. मध्यंतराला भारताकडे १९-९ अशी १० गुणांची आघाडी होती. इराणने पहिल्या हाफनंतर आपला खेळ उंचावत शानदार पुनरागमन केले. दुसऱ्या हापच्या सुरुवातीलाच इराणने भारताला ऑलआऊट केले. त्यामुळे २६-२२ असा अटीतटीचा सामना रंगला. इराण फक्त चार गुणांनी भारताच्या मागे होता. अखेरच्या काही मिनिटांत भारताने आपला खेळ उंचावला. सुपर टॅकलनंतर अर्जुन देशवालने दोन गुण मिळवले. अखेर भारताने ३३-२८ असा विजय मिळवला.
भारतीय संघाने लागोपाठ चौथ्या विजयाची नोंद केली. भारताने आठव्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशीपच्या विजायाकडे कूच केली आहे. आतापर्यंत भारताने सात आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत चषकावर नाव कोरले आहे. इराणने एक वेळा विजेतेपद पटकावला आहे. इराणने २००३ मध्ये आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत चषकावर नाव कोरले आहे.
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…