रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात दापोली (Dapoli) हर्णै राज्य मार्गावर आसूद येथे रविवारी दुपारच्या सुमारास ट्रक व मॅजिक प्रवासी रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघात (Fatal accident) काहीजण जखमी झाले आहेत.
ट्रक आणि मॅजिकच्या भीषण अपघातातील मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. या अपघातात हर्णै येथील प्रवासी मॅजिक गाडीचालक अनिल उर्फ बॉबी सारंग यांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे मोठी खळबळ उडाली असून प्रथमदर्शनी ट्रक चालकाच्या चुकीमुळे चार जणांना जीव गमवावा लागल्याचा अंदाज आहे.
अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघात जिथं झाला तिथं स्थानिकांसह वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे. काही जखमी प्रवाशांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर काही प्रवाशांना पुढील उपचार करता पाठवण्यात आले आहे.
मरियम गौफिक काझी ६ वर्षे, स्वरा संदेश कदम ८ वर्षे, संदेश कदम, ५५ वर्ष, अनिल सारंग ४५ वर्षं, फराह तौफिक काझी, २७ वर्ष अशी मृतांची नावे आहेत.
१) विनायक हशा चौगुले-४५ पाजपंढरी
२) श्रध्दा संदेश कदम-१४ अडखळ
३) मिरा महेश बोरकर-२२ पाडले
४) भुमी सावंत-१७ हर्णे (मुंबई ट्रान्सफर)
५) मुग्धा सावंत-१४ हर्णे (मुंबई ट्रान्सफर)
६)वंदना चोगले-३८ पाजपंढरी
७)ज्योती चोगले-०९पाजपंढरी
८)विनोद चोगले-३० पाजपंढरी
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…