मुंबई (प्रतिनिधी) : पालिकेने पावसाळापूर्व तयारीच्या कामांमध्ये शहरातील अतिधोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून छाटणी जवळपास पूर्ण केली आहे. तसेच जी झाडे कमी धोकादायक आहेत, अशा उर्वरित झाडांचीही शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात येणार आहे. असे असले तरी मुंबईकरांनी पावसात झाडांखाली थांबू नये, असे आवाहन उद्यान विभागाकडून करण्यात आले आहे.
पावसाळ्यातील संभाव्य धोके ओळखता महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे मुंबई महानगरातील प्रामुख्याने धोकादायक झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात आली आहे. वेगाने वारे वाहिल्यास त्या दरम्यान झाडे किंवा फांद्या कोसळण्याची शक्यता असते, ही बाब लक्षात घेऊन आवश्यक ते मनुष्यबळ साधनसामुग्रीसह व वाहनांसह उपलब्ध करून घेण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी पावसात झाडांखाली थांबणे टाळावे. सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू असताना झाड अथवा फांद्या तुटण्याची दाट शक्यता असते. याशिवाय वीज कोसळण्याचीदेखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसापासून बचाव करताना मुंबईकरांनी शक्यतो झाडांखाली थांबणे टाळावे, असे आवाहन उद्यान विभागाने केले आहे.
सोसायटीच्या आवारातील, परिसरातील, रस्त्यांभोवती अतिधोकादायक असलेल्या झाडांबाबत मुंबईकरांनी विभाग कार्यालयात तत्काळ कळवावे, असे आवाहन महापालिकेच्या उद्यान विभागाकडून करण्यात आले आहे. दिनांक १ ते १९ जून २०२३ दरम्यान शहरातील १४७ झाडे आणि २५३ फांद्या तुटल्या आहेत. यात महापालिकेच्या हद्दीतील ३९, तर खासगी मालमत्तेतील १०८ झाडांचा समावेश आहे. भविष्यात दुर्घटना घडू नये म्हणून उद्यान विभागाने महानगरात अतिधोकादायक झाडे आणि फांद्यांचे सर्वेक्षण केले असून, त्यानुसार खबरदारी घेत झाडांची छाटणी करण्यात आली आहे.
उद्यान विभागाने शासकीय आणि खासगी मालमत्तेच्या ठिकाणी असलेल्या साडे चार हजार झाडांच्या छाटणीबाबत संबंधित विभागांना आणि मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. या झाडांची देखील लवकरात लवकर छाटणी करण्यात येणार आहे. तसेच मुंबईकरांनी आपल्या आवारातील धोकादायक झाडांची रितसर परवानगी घेऊन छाटणी करून घ्यावी आणि भविष्यातील धोका टाळावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात आज पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…
नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला…
नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…
एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…