PM Narendra Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अमेरिकेत जंगी स्वागत

Share

काल न्यूयॉर्कमध्ये झालेल्या मोदींच्या योगा कार्यक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद

वॉशिंग्टन डीसी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याच्या (PM Narendra Modi US Visit) आजच्या दुस-या दिवशी न्यूयॉर्कमधील (New York) योगदिनाचा कार्यक्रम आटोपून ते वॉशिंग्टन डीसीमध्ये (Washington DC) दाखल झाले. तिथे पंतप्रधानांना अमेरिकेन विमानतळावर गार्ड ऑफ ऑनर (Guard of Honour) देऊन त्यांचं शाही स्वागत करण्यात आलं. यानंतर व्हाईट हाऊसमध्ये (White House) दाखल झाल्यावरही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) आणि फर्स्ट लेडी जिल बायडन (Jill Biden) यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडन यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. त्यानंतर मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डीनरचे (State Dinner) आयोजन करण्यात आले आहे. यात दोघांमध्येही महागड्या आणि खास भेटवस्तूंची देवाणघेवाण होणार आहे. याचबरोबर धूम स्टुडिओ या भारतीय डान्स स्टुडिओच्या संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यात मोदींसोबत बायडेन दाम्पत्यही सहभागी होणार आहे.

व्हाईट हाऊसतर्फे मोदींना २० व्या शतकातील हाताने बनवलेली प्राचीन अमेरिकन बुक गॅलरी (American book gallery) भेट देण्यात येणार आहे. यासोबतच राष्ट्राध्यक्ष बायडन पंतप्रधान मोदींना विंटेज अमेरिकन कॅमेरा (Vintage American camera) आणि वाइल्डलाइफ फोटोग्राफीचे हार्डकव्हर पुस्तकही भेट देणार आहेत. तर फर्स्ट लेडी जिल बायडेन पंतप्रधान मोदींना रॉबर्ट फ्रॉस्ट यांच्या संग्रहित कवितांच्या पहिल्या आवृत्तीचे पुस्तक भेट देणार आहेत.

आपल्यावर इंद्रदेवता प्रसन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गार्ड ऑफ ऑनर विषयी विशेष बाब म्हणजे मोदींचं विमान लँड झालं तेव्हा पाऊस पडत होता. मात्र भर पावसातसुद्धा गार्ड ऑफ ऑनर मोठ्या दिमाखात पार पडला. या प्रसंगी अमेरिकन सरकारचे वरिष्ठ प्रशासकीय आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते. आपल्यावर इंद्रदेवता प्रसन्न आहे, असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये देखील म्हटलं आहे.

मोदींच्या योगा कार्यक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद

९व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (International Yoga Day) बुधवारी २१ जूनला संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या योगा कार्यक्रमात १८० हून अधिक देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग नोंदवला गेला. योगाशी संबंधित एखाद्या कार्यक्रमात सर्वाधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. त्यामुळे याची नोंद गिनीज बुकमध्ये (Guinness World Record) करण्यात आली आहे.

९ वर्षांपूर्वी येथून २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्याची संधी मला मिळाली. संपूर्ण जग यामध्ये सहभागी झाले याचा मला आनंद झाल्याचं मोदी म्हणाले. या योगा सत्रातील काही खास क्षणांचा व्हिडीओ पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटरद्वारे शेअर केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

3 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

3 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

3 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

4 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

4 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

5 hours ago