लंडन : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) संघांमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final 2023) च्या अंतिम फेरीत टीम इडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर काही वेळाने फायनलची प्लेईंग इलेव्हन जाहीर होताच अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. त्यात भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांचेही नाव आहे. कॉमेंट्री करताना त्यांनी आपला राग काढला.
सुनील गावस्कर यांनी प्लेइंग-११ वर प्रश्न उपस्थित केले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी खेळपट्टीच्या बाबतीत वेगवान गोलंदाजांना प्राधान्य दिले. परंतु ते म्हणाले की, प्लेइंग-११ मध्ये फक्त एकच फिरकी गोलंदाज दिसला तो रवींद्र जडेजा. अनुभवी फिरकी मास्टर आर अश्विनला संघात स्थान देण्यात आले नाही. तो टीम इंडियासाठी दीर्घ फॉरमॅटमध्ये विकेट घेणारा गोलंदाज आहे. संघाला अंतिम फेरीत नेण्यात अश्विनचे मोलाचे योगदान आहे.
अश्विनच्या गैरहजेरीवर कॉमेंट्रीदरम्यान प्रश्न उपस्थित करताना गावसकर म्हणाले, ‘अश्विन संघात नसल्याचं मला आश्चर्य वाटतं. त्याच्यामुळेच टीम इंडिया इथपर्यंत पोहोचली आहे. अश्विन या विकेटवर कोणतेही मोठे नुकसान करत नाही. उमेश यादवच्या जागी अश्विनचा संघात समावेश करता आला असता. सुनील गावस्कर यांच्यानंतर हरभजन सिंगनेही त्यांच्या युक्तिवादाचे समर्थन केले.
पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ८५ षटकांत ३ गडी गमावून ३२७ धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ नाबाद ९५ आणि ट्रॅव्हिस हेड नाबाद १४६ धावांवर खेळत आहे.
टीम इंडियाकडून मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…