अब्बु आझमी आणि औरंगजेबांवर थुंकून दाखवा : नितेश राणे

Share

नितेश राणे यांनी संजय राऊतांचा घेतला समाचार

संजय राऊतांना पुरवले अग्रलेखाचे विषय

सिंधुदुर्ग : संजय राऊत महाराष्ट्रात होणार्‍या दंगलींबाबत भाजपला दोष देत आहेत. मात्र त्यांचा पक्षाचा गैरकारभार केवढा मोठा आहे आणि संजय राऊतांना स्वतःच्याच पक्षात महत्त्व नाही हे दाखवून देताना भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांचा चांगलाच समाचार घेतला.

संजय राऊत छत्रपती संभाजीनगरमध्ये बसून भाजपच्या कामांवर टीका करत आहेत. पण त्यांना विचारेन की, काल शरद पवारांनी ‘मी छत्रपती संभाजीनगरला औरंगाबादच म्हणणार’ असं जे विधान केलं, त्यावर त्यांना आव्हान देण्याची तुमची हिंमत आहे का? छत्रपती संभाजीनगर हे नामकरण करण्याची हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती. मग त्यांच्या विचारांशी तुम्ही आणि तुमचा मालक किती एकनिष्ठ आहात, हे समजेल. तुमची आव्हान देण्याची हिंमत नाही तिथेच तुम्ही महाविकास आघाडीतली तुमची लायकी ओळखावी. हे बोलताना संजय राऊतांचा ‘भांडुपचा देवानंद’ असा उल्लेख करत नितेश राणेंनी खिल्ली उडवली.

पुढे नितेश राणे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी दंगली होण्याच्या काही महिन्यांअगोदरच महाराष्ट्रात दंगली होणार, असे वक्तव्य केले होते. काँग्रेसच्या कोल्हापूरमधील एका नेत्यानेदेखील कोल्हापूरमध्ये दंगल होणार असा दावा केला होता. यांना पूर्वसूचना कशा मिळाल्या? त्यामुळे दंगलींबाबत भाजपवर आरोप करण्यापेक्षा आणि मणिपूर हिंसाचारावरून अग्रलेख लिहिण्यापेक्षा संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतल्या त्यांच्या या सहकार्‍यांना दंगलीबाबत विचारावं. यासंबंधी उद्धव ठाकरेंकडून ट्रेनिंग घेतलं जातं की काय? असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला.

४०० जणांच्या धर्मांतरावर अग्रलेख लिहावा

आव्हाडांच्या मतदारसंघामध्ये ४०० जणांचं धर्मांतर झाल्याची माहिती मिळत आहे. याबद्दल संजय राऊतांनी सविस्तर अग्रलेख लिहावा, असं आव्हान नितेश राणेंनी दिलं. यातूनच कोणाचं औरंगजेबावर प्रेम आहे हे दिसून येत आहे, असंही नितेश राणे म्हणाले.

अब्बु आझमी आणि औरंगजेबांवर थुंकून दाखवा

याचवेळी नितेश राणेंनी आणखी एका बाबतीत संजय राऊतांना तोंडावर पाडलं आहे. ते म्हणाले, “ज्यांना संभाजीनगर बोलता येत नाही अशांना आव्हान द्यायची तुमची हिंमत होत नाही आणि आमच्या नेत्यांची नावं काढल्यावर तुम्ही थुंकता? तुम्हाला थुंकायचीच सवय असेल तर काल समाजवादी पक्षाचे नेते अब्बु आझमींनी ‘मी औरंगजेबला मानतो, तो माझा नेता आहे’, अशा जाहीरपणे केलेल्या वक्तव्यानंतर अब्बु आझमी आणि औरंगजेबांवर थुंकून दाखवा मग बघा तुमच्या ढुंगणावर लाथा मारुन कसं तुम्हाला महाविकास आघाडीतून बाहेर काढतील”.

मातोश्री २ चा खरा मालक नंदकिशोर चतुर्वेदी

उद्धव ठाकरे ज्याच्याकडे खोके ठेवतात अशा मातोश्री २ चा खरा मालक नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या घरावर काल असंख्य छापे पडले. त्याच्याच कंपनीतून उद्धव ठाकरेंचा मेहुणा श्रीधर पाटणकरला पैसे पुरवले गेले आहेत, असा आरोप नितेश राणेंनी केला. नंदकिशोर आता स्वतः फरार आहे, त्याला लपवलंय किंवा गायब केलंय का याबाबत संजय राऊतांनी अग्रलेख लिहावा.

संजय राऊत शिंदेसाहेबांना भेटतील

याचवेळी आदित्य ठाकरेंचं संजय राऊत यांच्याशी पटत नाही, असं नितेश राणे म्हणाले. त्यांनी सुरु केलेल्या ‘आवाज कोणाचा’ या पॉडकास्टमध्ये आदेश बांदेकर पहिली मुलाखत अनिल परब यांची घेणार आहेत. म्हणजेच संजय राऊतांना कुठेही स्थान नाही. काल जसं सेनाभवनचे काही कर्मचारी पगार मिळत नाही म्हणून शिंदेसाहेबांना जाऊन भेटले, तसंच उद्या संजय राऊतही पगार देत नाहीत म्हणून शिंदेसाहेबांना जाऊन भेटले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही, असं म्हणत नितेश राणेंनी संजय राऊतांचे वाभाडे काढले.

Recent Posts

बॉलीवूड सेलिब्रिटींनी केले भारतीय जवानांच्या शौर्याचे कौतुक!

श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…

11 minutes ago

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

1 hour ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

1 hour ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

2 hours ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

2 hours ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

2 hours ago