थंडा थंडा कूल कूल!

Share

मुक्तहस्त : अश्विनी पारकर

रूह अफजाचा जन्म सरबत म्हणून कधी झालाच नव्हता. ते होतं खरं तर औषध! हकीम हाफिज अब्दुल मजीद हे त्यांच्या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांवर विविध औषधींचे सरबत तयार करून उपचार करायचे. तेच हे सरबत!

कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवाला थंड करणाऱ्या शीतपेयांची कितीही मागणी असली तरी रूह अफजा आणि गाडीवर कोनमध्ये मिळणारं आईस्क्रीम या दोघांना पर्याय नाही. कितीही नावाजलेले ब्रँड्स आले काय, नि किती फ्लेव्हर्सनी बाजारात आपलं नशीब आजमावलं तरी या दोहोंनी थंड न झालेला आत्मा विरळाच. या दोघांच्या जन्माच्या कथाही तितक्याच चवदार…

तळपत्या उन्हात आत्मा थंड करणाऱ्या गुलाबी औषधाची गोष्ट
उन्हाळ्यात सर्वात जास्त खपणाऱ्या रूह अफजाची जादू सर्वांवर आहे. जगात सर्वांना आपल्या थंडाव्याने भुरळ घालणारा रूह अफजा भारतात, अगदी मुंबईतही अनेक स्टॉल्सवर हमखास मिळतो. कधी पाण्यात, कधी दुधात आणि सर्वात जास्त फालुद्यात तो आपल्या भेटीला येतो. या रूह अफजाची जन्मकथा त्याच्याइतकीच स्वादिष्ट.

रूह अफजाचा जन्म शरबत किंवा सरबत म्हणून कधी झालाच नव्हता. ते होतं खरं तर औषध. हमदर्द असं अगदी दर्दी नाव असलेल्या दुकानात युनानी हकीम हाफिज अब्दुल मजीद यांनी १९०६ साली या औषधाचा शोध लावलेला. त्यांच्या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांवर ते विविध औषधींचे सरबत तयार करून उपचार करायचे. दिल्लीच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात जुलाब, अतिसार, उष्णदाह होणाऱ्या रुग्णांना ते हे सरबत द्यायचे.

गुलाबाच्या पाकळ्या, विविध औषधी मुळं, वनस्पती, फुलं, भाज्या घालून हे सरबत तयार होतं. गुलाबाच्या पाकळ्या जुलाबावर रामबाण. त्यामुळे याचा वापर त्यात असायचाच. आज हे रूह अफजा उष्मदाहापासून अनेकांचे संरक्षण करत आहे.

हकीम हाफिज अब्दुल मजीद यांनी १९१० साली हे सरबत दिल्लीत विकायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी विशिष्ट अशी बाटली तयार करून घेतली. या बाटलीचा आकार खालून दंडगोल व वरून डोंगरासारखा निमुळता होत जातो. त्यावर त्यांनी खास मिर्झा नुर अहमद या चित्रकाराने लेबल लावले. विशिष्ट प्रकारच्या बटर पेपरवर छापलेले अशा पद्धतीचे लेबल त्याकाळी दिल्लीत प्रिंट होत नव्हते. मग ते त्यांनी मुंबईतील एका पारसी प्रिंटरच्या प्रिटिंग प्रेसमधून प्रिंट करून घेतले.

पुढे हाफिज अब्दुल मजीद यांच्या दोन मुलांनी हा व्यवसाय वाढवला. भारताच्या फाळणीनंतर त्यांचा मोठा मुलगा भारतात राहिला, तर लहान मुलगा पाकिस्तानात गेला व कराची येथे त्याने हा रूह अफजाचा व्यवसाय थाटला. पुढे याच लहान मुलाने आपल्या मुलीच्या नावे बांगलादेश वेगळा झाल्यावर बांगलादेशमध्येही हा व्यवसाय थाटला. काही काळाने त्याने बांगलादेशमधील व्यवसाय तेथील एका स्थानिक व्यक्तीकडे सोपवला.

रूह अफजा भारतातही तयार होतो. पाकिस्तानात अन् बांगलादेशातही तयार होतो. पण सर्वत्र रूह अफजाची चव ही सारखीच असते कारण, बनवण्याचा फॉर्म्युला तोच आहे. अनेक कंपन्यांनी रूह अफजाला कॉपी करण्याचा प्रयत्न केला. पण ते काही रूह अफजाची कीर्ती अन् अस्सलता कमवू शकले नाहीत. रूह अफजानेही बदलत्या काळाप्रमाणे काही नवीन प्रकार बाजारात आले. पण रमजान असो अथवा उन्हाचा कडाका, ज्युसचा ठेला अथवा स्वयंपाकघरातही रूह अफजा त्याच्या नावाप्रमाणेच सर्वांना ताजतवान अन् शांत करतो. माहितीये का रूह अफजा या नावाचा अर्थ काय? इंग्रजीत रिफ्रेशिंग सोल (Refreshing Soul) म्हणजेच मराठीत अगदी चुस्तपुस्त… ताजातवाना झालेला आत्मा!

आईस्क्रीमची कोनवर अशी झाली स्वारी…
लहानपणापासून जत्रेचं प्रत्येकाला आकर्षण असतं. गावागावातल्या जत्रांसोबत आज मुंबईतही पारंपरिक जत्रा पाहायला मिळतात. आजकाल मॉलमध्ये, शोरूम्समध्ये थोऱ्या- मोठ्यांसाठी ‘फेअर फन’चे आयोजन केले जाते.

१९०४ साली अमेरिकेत सेंट लुईस, मिसुरी येथे सेंट लुईस वर्ल्ड येथेही अशीच फेअर म्हणजे जत्रा भरली होती. या जत्रेत हॅमवी नावाचा विक्रेता वॅफल्ससारखी कुरकुरीत पेस्ट्री विकत होता. याला ‘झालाबी’ असं म्हणत. त्यावेळेही आईस्क्रीमचे खव्वये होते. त्यामुळे त्याच्या शेजारीच आईस्क्रीमवाल्याकडे प्रचंड गर्दी होती. ही गर्दी नंतर इतकी वाढली की, आईस्क्रीम वाढायच्या डिशेस संपल्या. हॅमवीने हे पाहिले आणि त्याला एक कल्पना सुचली. पापडासारखे गोलाकार हे कुरकुरीत वॅफेल्स म्हणजेच ‘झालाबी’ गोलाकार वळवून त्याने कोन तयार केला. या कोनवर त्याने त्या विक्रेत्याला आईस्क्रीमचा स्कूप ठेवायला सांगितला. झालं ना तयार गारेगार आईस्क्रीम कोन.

आज आईस्क्रीमसाठी कितीही सुंदर कप किंवा बॉक्स द्या. आईस्क्रीम खाण्याची मजा कोनमध्येच येते. एकेकाळी पापडासारखा पेस्ट्री म्हणून खाल्ला जाणाऱ्या या पदार्थापासून कोन तयार झाला. त्यावर आईस्क्रीम स्वार झालं आणि लहानांपासून सर्वांना जणू एखादी मांजर दूध चाटून पिते, तशी एक गारेगार ट्रीट मिळाली, तीही अगदी स्वस्तात मस्त!

Recent Posts

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

52 seconds ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

15 minutes ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

30 minutes ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

1 hour ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

2 hours ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

6 hours ago