नाशिक: राज ठाकरेंच्या भाषणांना होणाऱ्या गर्दीचं मतांमध्ये रुपांतर होत नाही. आज नाशिक दौऱ्यादरम्यान त्यांनी ही खंत सवाल विचारत व्यक्त केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. ते तेथील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसह विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी ही खंत व्यक्त केली.
दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी आज सकाळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी सुरत-चेन्नई महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आपलं गाऱ्हाण राज ठाकरेंसमोर मांडलं. जमीन अधिग्रहित करताना आपल्याला विचारलं नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांनी राज्यात अवकाळी पावसामुळं शेतीचं झालेलं नुकसान, बॅंकेची वसुली, कांद्याचं भाव पाडणं याविषयावरही आपलं गाऱ्हाणं मांडत राज ठाकरे यांनी यावर तोडगा काढवा, अशी मागणी केली.
यावेळी राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना, तुम्ही अडचणीच्या काळात माझ्याकडे येता, मग मतदानाच्या वेळी काय होतं? असा सवाल केला. राज ठाकरे पुढे म्हणाले, दरम्यानच्या काळात शेतकरी संपावर गेले होते. तेव्हा काही शेतकरी बांधव मला भेटायला आले. मी त्यांना सांगितले की, अडचणीच्या वेळी माझ्याकडे येता आणि निवडणुकीत मतदान त्यांना करता. त्यावेळी शेतकरी मला म्हणाले, साहेब, समस्या वेगळी आणि मतदान वेगळे.
राज ठाकरे पुढे म्हणाले, जे तुम्हाला मदत करत नाहीत त्यांना तुम्ही मतं देत असाल तर मग अडचणीच्या वेळी माझ्याकडे का येता? महाराष्ट्र टोलमुक्त करू असे म्हणणाऱ्यांना तुम्ही मतदान केलं की नाही? जे तुमची पिळवणूक करतात, त्यांनाच तुम्ही मतदान करता. आपण काय करत आहात याची जाणीव ठेवा, असा रोखठोक शब्दांत सल्लाही राज ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…