मुंबई : विविध तांत्रिक कारणांसाठी येत्या रविवारी मध्य रेल्वेतर्फे हार्बर मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी ११.०५ ते दुपारी ०३.५५ पर्यंत माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर असेल. ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ०३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.
पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
ब्लॉकदरम्यान पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेलकरीता जाणारी डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी भागात विशेष लोकल धावतील.
ठाणे ते वाशी व नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाइन सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर – खारकोपर आणि नेरुळ – खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.
श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…