डहाणू (प्रतिनिधी) : डहाणू तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीमधील, नऊ प्रभागात काल झालेल्या मतदानाची मतमोजणी आज पूर्ण झाली. जरी पक्ष चिन्हावर ही पोट निवडणूक झाली नसली तरी, या पोटनिवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये बहुतेक ग्रामपंचायतीवर डहाणूचे माजी नगराध्यक्ष भरतसिंग राजपूत यांनी दिलेल्या योगदानामुळे भाजपचे उमेदवार निवडून आले. तर मोखाडयातील चित्र काहीसे वेगळे आहे. राज्यात भाजप शिंदे गट एकत्र असला तरी देखील, या ठिकाणी शिंदे गटाचे वर्चस्व दिसून आले.
१९ मे रोजी डहाणूच्या सेंट मेरीज हायस्कूलमध्येआठ ग्रामपंचायतीमधील नऊ प्रभागात झालेल्या पोटनिवडणूक मतमोजणीत निवडून आलेल्या सर्व महिला ह्या अनुसूचित जमातीच्या आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी विजयी उमेदवारांची नावे
घोषित केली.
तत्पूर्वी दहाळे ग्रामपंचायतीचे उमेदवार प्रतिभा विष्णू बसवत आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार, अमिता जयदेव रावते यांना,समान प्रत्येकी ८३ मते पडल्याने लॉटरी पद्धतीने चिठ्ठी टाकून प्रतिभा विष्णू बसवत यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. तर मोखाडयात स्थानिक पातळीवर मात्र मतभेद दिसून आले. तालुक्यातील काष्टी सावर्डे या आजवर भाजपाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीत थेट सरपंच पदाच्या शर्यतीत बाजी मारत भाजपाला धोबीपछाड केले होते. याचाच वचपा काढण्यासाठी काल झालेली पोटनिवडणुक तालुका भाजपाने प्रतिष्ठेचे केली होती. मात्र या पोटनिवडणुकीतही शिवसेना (शिंदे गट)यांनी बाजी मारत सुनीता अंकुश बोटे या विजयी झालेल्या आहेत. काल झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतदानात तालुक्यातील काष्टी सावर्डे या ग्रामपंचायतमधील या एका जागेला ज्या पद्धतीने भाजपने प्रतिष्ठेचे केले होते त्यामुळे या जागेला विशेष महत्व प्राप्त होवून संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणूकीकडे लागले होते. या मतदार संघात भाजपचे प्राबल्य हाेते.
तलासरीत ‘माकपा’ ची बाजी
तलासरी तालुक्यातील ग्रामपंचायत वसा आणि ग्रामपंचायत डोंगारीच्या पोट निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तिन्ही जागा जिंकून भाजपाला पराभूत केले. तालुक्यातील डोंगारी ग्रामपंचायतच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक लागली. पण माकपच्या सुवर्णा संदीप बोबा यांच्या विरोधात कोणीही अर्ज दाखल न केल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या.
ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवार :-
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…