रजनीश कर्नाटक यांची माहिती
मुंबई : आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ इंडियाला २०२२-२३ या आथिर्क वर्षात १३५० कोटींचा निव्वळ नफा झाला असून १२३ टक्क्याने त्यात वाढ झाली असल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रजनीश कर्नाटक यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले की, बँकेच्या वैश्विक व्यवसायात ९.२७ टक्क्याने वाढ झाली असून मार्च २०२२ मध्ये १०,८४,९१० कोटी इतका हा व्यवसाय होता. तो मार्च २०२३ मध्ये ११,८५,४३८ कोटी झाला आहे.
बँक ऑफ इंडियाचा संचालनात्मक नफा मागील वर्षाच्या तुलनेत ६९.६७ टक्के वाढला, आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीत संचालनात्मक नफा २४६६ कोटी रुपये होता. जो आर्थिक वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीत ४१८४ कोटी रुपये नोंदवला गेला आहे. आहे. तर बँकेचे निव्वळ व्याजाच्या माध्यमातून उत्पन्न ३७.७७ टक्क्याने वाढले आहे. आर्थिक वर्ष २०२२ च्या चौथ्या तिमाहीत ते ३,९८७ कोटी रुपये इतके होते. आता ते २०२३ चा चौथ्या तिमाहीत ५,४९३ कोटी रुपये झाले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ते आणखी म्हणाले, सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना क्रेडिट मागील वर्षीच्या तुलनेत ९.३१ टक्क्यांनी वाढले आणि मार्च २३ मध्ये ७०,७७७ कोटी रुपये झाले. सकल एनपीए मागील वर्षीच्या तुलनेत १७.३६ टक्क्याने कमी झाला,मार्च २२ मध्ये ४५६०५ कोटी रुपये होता. मार्च २३ मध्ये ३७६८६ कोटी रुपये झाल्याचे ते म्हणाले.