बारसू रिफायनरी समर्थनार्थ राजापुरात आज भव्य मोर्चा

Share

मोठ्या संख्येने समर्थक होणार सामील

राजापूर (प्रतिनिधी) : ‘भावी पिढीच्या भविष्यासाठी आणि कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी बारसू येथे प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे’ या मागणीसाठी व या प्रकल्पाला असलेल्या समर्थनाची ताकद दाखविण्यासाठी शनिवारी ६ मे रोजी राजापुरात भव्य रिफायनरी समर्थन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता बंदरधक्का येथे एकत्र जमून तेथून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. जवाहर चौकात येऊन समर्थकांची शक्ती व संघटन दाखवतानाच रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, असा नारा देण्यात येणार आहे.

राजापूर शहरातील बंदर धक्का येथून या समर्थन मोर्चाला प्रारंभ होणार असून तो जवाहर चौकात येणार आहे. तेथे या समर्थन मोर्चाला उपस्थित सर्व मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या समर्थन मोर्चाला केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार यांसह सर्वपक्षीय समर्थक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप तालुका अध्यक्ष अभिजीत गुरव, शिवसेना तालुका प्रमुख अशफाक हाजू व रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीचे नेते हनिफ मुसा काझी यांनी दिली आहे. यासाठी प्रशासनाकडून योग्य ती परवानगी घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

राजापूर तालुक्यात बारसू परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला दिवसेंदिवस समर्थन वाढत आहे. मात्र तरीही बाहेरून येणारी काही मंडळी प्रकल्पाच्या विरोधात नारा देत स्थानिकांना चुकीची माहिती देऊन भडकविण्याचा व वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत, तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री असताना प्रकल्पासाठी बारसूच्या जागेचे पत्र पंतप्रधानांना दिलेले असतानाही आता तेच या प्रकल्पाला विरोध करत असून ६ मे रोजी त्यांनी प्रकल्प स्थळी येण्याची घोषणा केली आहे. याच समर्थकांनी आता एकत्रित येऊन समर्थकांची ताकद दाखविण्यासाठी समर्थकांकडून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

रिफायनरीसाठी ड्रिलचे काम सुरळीत सुरू

आंदोलकांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून ठिकठिकाणी जमाव करून ड्रिलच्या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस प्रशासनाने तत्काळ आवश्यक ती कार्यवाही करून आंदोलकांना ड्रिलचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पोहोचू दिले नाही व आंदोलकांची पांगापांग केली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बारसू येथील परिस्थितीवर व्यवस्थित नियंत्रण ठेवले असून ड्रिलचे कामही सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. या आंदोलनात सहभागी ग्रामस्थ अमोल बोळे व इतरांनी आम्हाला शेतीविषयक कामे करण्यासाठी व घरी जाण्यास प्रशासन १४४ कलमानुसार रोखत असून हे आदेश तत्काळ मागे घ्यावेत, अशी याचिका मुंबई हायकोर्ट येथे दाखल करण्यात आली होती. त्या अानुषंगाने न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेश मागे घेण्याच्या निर्णयास २४ तास पूर्ण होण्यापूर्वीच अमोल बोळे, कमलाकर गुरव व इतरांनी आंदोलनात सहभाग घेतल्याने अमोल बोळे व कमलाकर गुरव यांना अटक करण्यात आली आहे. या सर्व घटनांनंतर पोलिसांनी परिस्थितीवर व्यवस्थित नियंत्रण ठेवले असून ड्रिलचे कामही सुरळीत सुरु आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

बंदरधक्का येथे सकाळी ११ वाजता एकत्र जमून तेथून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. जवाहर चौकात येऊन समर्थकांची शक्ती व संघटन दाखवतानाच रिफायनरी प्रकल्प झालाच पाहिजे, असा नारा देण्यात येणार आहे. या समर्थन मोर्चाला राजापूर शहरसह ग्रामीण भागातील सर्व समर्थक, विविध सामाजिक संघटना व त्यांचे पदाधिकारी, विविध वाहतूक संघटना, व्यापारी संघटना, आंबा बागायतदार असे हजारो लोक उपस्थित राहणार आहेत. अत्यंत शांततापूर्ण वातावरणात हा मोर्चा काढला जाणार आहे. ‘आमचा कोणालाही विरोध नाही तर कशाप्रकारे हा प्रकल्प तालुका, जिल्हा, राज्य आणि देशाच्या विकासात महत्त्वाचा ठरू शकतो हे सांगतानाच समर्थनाची शक्ती किती मोठी आहे हे दाखवून देण्यासाठी हा समर्थन हा मोर्चा आहे’, असे निलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शनिवारी समर्थकांची शक्ती दिसून येईल, असेही गुरव, हाजू व काझी यांनी सांगितले. प्रशासनाकडे अशाप्रकारे समर्थन मोर्चासाठी आम्ही योग्य व कायदेशीर परवानगी मागितलेली आहे. त्यामुळे शांततेत मोर्चा काढून आमच्या समर्थनाची ताकद दाखवणारच, असेही त्यांनी सांगितले.

Recent Posts

बॉलीवूड सेलिब्रिटींनी केले भारतीय जवानांच्या शौर्याचे कौतुक!

श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…

27 minutes ago

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

2 hours ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

2 hours ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

2 hours ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

2 hours ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

3 hours ago