मुंबई : भाजपची नवीन कार्यकारिणी आज जाहीर करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. नवीन कार्यकारिणी तब्बल बाराशे सदस्यांची जम्बो टीम राहील. या कार्यकारिणीच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी सज्ज होणार असल्याचे तसेच ४८ लोकसभा आणि विधानसभेच्या २०० हून अधिक जागा जिंकण्याचा त्यांनी पुनरुच्चारही यावेळी केला.
नवीन कार्यकारिणीत राज्यातील केंद्रीय व प्रदेश नेते, विशेष निमंत्रित
दर तीन वर्षांनी कार्यकारिणीची नव्याने रचना केली जाते. जुन्या कार्यकारिणीला साडे तीन वर्षे झाली आहेत, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. बावनकुळे यांनी १२ ऑगस्ट रोजी पदभार स्वीकारला. टीम तयार करण्यासाठी त्यांना ९ महिने लागले आणि विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तितकाच कालावधी बाकी आहे. नवीन कार्यकारिणीत राज्यातील केंद्रीय व प्रदेश नेते, विशेष निमंत्रित अशी सुमारे बाराशे जणांची टीम राहणार आहे.
आज राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक जाहीर केले जाणार आहे. तर नवीन जिल्हाध्यक्षांची टीम या महिन्याच्या अखेरपर्यंत सज्ज होईल. संघटनात्मक बदलाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण केली जाईल, असा दावाही बावनकुळे यांनी केला.
ठाकरे नावाची नाटक कंपनी, ते नौटंकी करताहेत…
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, बावनकुळे यांनी परत एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अमित शहा यांना भुईसपाट करण्याची भाषा करणारे ठाकरे केव्हा भूईसपाट होतील, कळणार नाही. ठाकरे नावाची नाटक कंपनी आहे. आधी ते बारसूच्या बाजूने होते, आता नौटंकी करत आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीत संख्या बघावी. तुम्ही सहाव्या क्रमांकावर आहात, त्यापेक्षा प्रकाश आंबेडकर समोर आहेत, असा टोलाही बावनकुळे यांनी ठाकरे यांना लगावला.
तुमच्या भोंग्याला सिंधुदुर्गातून निवडणूक लढण्यास सांगा…
तीन वर्षांपासून तुमचा भोंगा वाजतो आहे. आमचे मुख्य विशेष प्रवक्ते नितेश राणे यांनी उत्तर देताच त्यांचा अवमानकारक उल्लेख केला जातो. संजय राऊत यांना सिंधुदुर्गातून निवडणूक लढण्यास सांगा मग कळेल, असे आव्हानही बावनकुळे यांनी ठाकरे यांना पुन्हा दिले.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…