मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रियंका गांधी यांचे भाषण ट्विट केले असता त्याला उत्तर म्हणून भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकवले. जाहीर सभेत बोलताना काँग्रेसमोर झुकणारे हिजडे आहेत, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते. यावर नितेश राणे म्हणाले की, आता काँग्रेसमोर कोण झुकतेय, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत. उद्धव ठाकरे यांना आता बाळासाहेबांच्या भाषेत ठाकरे सेनाप्रमुख म्हणायचे की हिजड्यांचा प्रमुख म्हणायचे का? असा झोंबणारा सवाल करत आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रहार केला आहे.
लाव रे तो व्हिडिओ म्हणत नितेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ माध्यमांसमोर ठेवला. ज्यात ते काँग्रेससमोर झुकणाऱ्यांना हिजडा संबोधतात. हिजडा असे बाळासाहेबांनी म्हटले होते. मी नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. नेमका हाच दुवा पकडत, पाहा आता काँग्रेससमोर उद्धव ठाकरे, संजय राऊत झुकत असल्याची टीका राणेंनी केली. तसेच उद्धव ठाकरेंचा राजकीय लव्ह जिहाद झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे धर्मांतर झाले आहे. राजकीय लव्ह जिहाद झाला आहे. २०१९ ला यांना खुर्ची देताना यांचा सुंता करून टाकला आहे. धर्मांतर करून टाकले, अशा शब्दात नितेश राणेंनी खालच्या भाषेत टीका केली आहे.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…