दिल्लीच्या पहिल्या विजयानंतर गांगुलीची प्रतिक्रिया
दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली कॅपिटल्सने गुरुवारी यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला. या विजयाचा आनंद एकीकडे असताना संघाचे फ्रँचायजी डायरेक्टर सौरव गांगुली मात्र नाखुष होते. आम्हाला नशीबाने साथ दिली असे गांगुली म्हणाला.
सामना संपल्यानंतर गांगुली म्हणाला की, आज आम्हाला नशीबाने साथ दिली. आम्ही या हंगामाच्याआधीही चांगली गोलंदाजी केली होती. परंतु, समस्या फलंदाजीत आहे. आम्हाला स्वत:ला पाहण्याची आवश्यकता आहे. आम्ही चांगले प्रदर्शन कसे करू शकतो, हे पाहण्याची आम्हाला गरज आहे. फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली. आम्ही चांगले खेळलो नाही, याबाबत मला माहित आहे. आम्हाला चांगली फलंदाजी कशी करता येईल, यावर चांगला उपाय शोधण्याची गरज आहे.
गांगुली पुढे म्हणाला की, आम्ही खेळाडूंसोबत खूप मेहनत घेऊ आणि त्यांना फॉर्ममध्ये परत आणू. मग यात पृथ्वी शॉ असो, मनीष पांडे किंवा मिचेल मार्श असो. या खेळाडूंनी टीमसाठी याआधी खूप मोठे योगदान दिले आहे. आमच्याकडे एक दिवसाचा कालावधी आहे. त्यानंतर आम्ही हैद्राबादसाठी उड्डाण घेऊ. तिथे फलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी असेल, अशी आशा आहे.