मुंबई: महाराष्ट्राची परंपरा खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचवणारे, आपल्या शाहिरीने लोकांना प्रेमात पाडणारे, गाण्यातून समाजप्रबोधन करणारे शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट येत्या २८ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अंकुश चौधरी, सना शिंदे, निर्मिती सावंत, यांसारख्या कलाकारांची फौज चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
या ट्रेलरवर प्रेक्षकांच्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. ट्रेलरची सुरुवात आणि गाणी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. या ट्रेलरने प्रदर्शनासोबतच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. काही तासातच या ट्रेलर ६ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. प्रदर्शित होताच हा ट्रेलर युट्यूबवर सातव्या क्रमांकावर ट्रेंडिंग करत आहे.
शाहीर साबळेंशिवाय सिनेमात यशवंतराव चव्हाण, लता मंगेशकर, साने गुरूजी आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे देखील दिसणार आहे.
आजवर अनेक सिनेमांमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिका अनेक कलाकारांनी साकारल्या. महाराष्ट्र शाहीरमध्ये देखील बाळासाहेब ठाकरे प्रेक्षकांना दिसणार आहेत. महाराष्ट्र शाहीर सिनेमात अभिनेता दुश्यंत वाघ याने बाळासाहेबांची भूमिका साकारली आहे. दुश्यंतनं याआधी अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे.
महेश मांजरेकरांच्या ‘तेरा मेरा साथ रहना’ या सिनेमात दुश्यंतनं एका मतिमंद मुलाची भूमिका करत अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यानंतर २००५ मध्ये आलेल्या डोंबिवली फास्ट या सिनेमात त्यानं माधव आपटेच्या मुलाची भूमिका केली. २००९ मध्ये आलेल्या 3 इडियट्स या सिनेमा त्याने सेंटीमीटर ही प्रसिद्ध भूमिका साकारली होती.
अर्जुन कपूरच्या पानिपत सिनेमातही दमदार भूमिका साकारली. नुकत्याच आलेल्या धर्मवीर या सिनेमातही दुश्यंतनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. मन उधाण वाऱ्याचे या प्रसिद्ध मराठी मालिकेतही दुश्यंतनं काम केलंय.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…