ग्वाल्हेर (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय क्रमवारीत ८३व्या स्थानावर असलेली १४ वर्षीय बॅडमिंटनपटू नाईशा कौर अवघ्या ६५ मिनिटांमध्ये पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्सची उपांत्य फेरी गाठली. तिने गटातील महिला एकेरीच्या दुसऱ्या सामन्यामध्ये दुसऱ्या मानांकित खेळाडू नाईसा करियप्पावर सनसनाटी विजय संपादन केला.
तिने दुसऱ्या सामन्यामध्ये १७-२१, २१-१८, २१-१३ अशा प्रकारे सामना जिंकला. या विजयानंतर तिला महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित करता आला. महाराष्ट्राच्या या युवा खेळाडूला पदार्पणात पदकाची मानकरी होण्याची संधी मिळाली आहे. पहिल्या गेममधील अपयशातून सावरत युवा खेळाडू नाईशाने दुसऱ्या गेममध्ये दमदार कमबॅक केले. यादरम्यान तिने २१-१८ ने दुसरा गेम जिंकून सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर आपला दबदबा कायम ठेवत तिसरा गेम २१-१३ने जिंकून सामना आपल्या नावे केला.