Categories: किलबिल

निर्णयी केशव

Share

प्रा. देवबा पाटील

काटेगाव नावाच्या एका लहानशा खेडेगावात केशव नावाचा एक मुलगा होता. त्यांचा पिढीजात धंदा चपला, जोडे बनवायचा होता. त्याचे वडील दररोज नवनवीन छान छान प्रकारचे जोडे, चपला शिवायचे; परंतु ते पायाने जरा अपंग असल्याने जोडे, चपला विकण्यासाठी बाहेरगावी जाऊ शकत नव्हते. त्यामुळे ते विकण्यासाठी तो दररोज त्याच्या जवळच्याच जयपूर नावाच्या मोठ्या शहरात जायचा. ते विकून आलेल्या पैशांवर आपल्या घराचा व शाळेचा खर्च भागवायचा.

एके दिवशी केशव आपला जोडे, चपला विकून परत येत होता. तो आपला नेहमीसारखा रस्त्याच्या डाव्या बाजूने काठाकाठाने, झाडांच्या सावली-सावलीने पायी चालत येत होता. एवढ्यात एक तरुण मुलगा जसा काही लांडगा मागे लागल्यासारखा भरधाव वेगाने फटफटी चालवीत त्याच्या बाजूने मागून येऊन पुढे निघून गेला. एवढ्यात पुढच्या एका ट्रकला ओलांडून पुढे जाण्याच्या प्रयत्नात असताना समोरच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या ट्रकने त्याला उडविले. तो मुलगा जोराने दूर फेकला गेला व त्याची फटफटी त्याच्या अंगावर पडली. पुढचा ट्रक पुढे निघून गेला. ठोस मारणाऱ्या समोरून येणाऱ्या ट्रकचालकाने त्याच्या हातून अपघात झाल्याचे बघून उलट दुप्पट वेगाने आपला ट्रक दामटला.

केशव त्याच्याकडे ट्रकचा नंबर घोकतच धावू लागला. त्याने ती फटफटी उचलली व बाजूला केली नि त्या मुलाला उचलू लागला. पण त्या मुलाच्याने काही उठले जात नव्हते. बहुधा त्याचा एखादा पाय मोडला असावा, असे केशवला बाटले. तो नीट बोलूही शकत नव्हता. फक्त, अरे बापरे! आई गं! अशा अतीव वेदनांनी तो ओरडत होता. त्याच्या डोक्यालाही चांगलीच मोठी जखम झाली होती. जखमेतून रक्त वाहत होते.

केशवने प्रथम आपल्याजवळील एका फडक्याने त्याची डोक्याची जखम पक्की बांधली. केशवने रस्त्याकडे बघितले, तर त्याला एक जीप येताना दिसली. त्याने त्या जीपला हात दिला. अपघात झाल्याचे जीपचालकाच्यासुद्धा लक्षात आले त्याने त्यांच्याजवळ जीप थांबविली.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच जीपचालक जीपमधून पटकन खाली उतरला. केशव व तो चालक दोघांनी मिळून काळजीपूर्वक त्या मुलाला उचलून जीपमध्ये घेतले. केशव जीपमध्ये त्या मुलाच्या एका बाजूस बसला व त्या मुलाला धरून ठेवले.

तो चालक जीप चालवू लागला. जयपूरच्या दिशेने धावू लागली. थोड्या वेळात जीप दवाखान्याच्या जवळ पोहोचविली. केशवने व चालकाने त्या मुलाला दवाखान्यात भरती केले. दवाखान्यात डॉक्टर व डॉक्टरीणबाई दोघेही हजर होते. डॉक्टरांनी त्या मुलावर ताबडतोब उपचार सुरू केले. केशवने तो स्वत: कोण आहे व रस्त्यात जे घडले ते सविस्तर सांगितले. त्याने ट्रकचा नंबरही सांगितला. डॉक्टरीणबाईंनी केशवचे कौतुक केले नि फोन करून पोलिसांना घटनेची माहिती सांगितली. डॉक्टरांच्या उपचाराने थोड्याच वेळात त्या मुलाच्या वेदना कमी झाल्या व तो नीट बोलायला लागला. डॉक्टरीणबाईंनी त्या मुलाला त्याच्या घरचा फोन नंबर विचारून त्याच्या घरी फोन केला.

थोड्याच वेळात पोलीस तेथे आले. त्यांनी त्या मुलाचे व केशवचे बयाण नोंदवून घेतले. त्या मुलाचे आई-वडीलसुद्धा धावपळ करीत घाबरेघुबरे होत दवाखान्यात आले. डॉक्टरीणबाईंनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. आपल्या मुलाची ती अवस्था बघून लहान वयात त्याच्या मोटारसायकल चालविण्याचे कौतुक करण्याची त्याच्या वडिलांची ऊर्मी जागच्या जागीच जिरली. त्यांनी कसेतरी केशवचे आभार मानले.

डॉक्टारीणबाईंची परवानगी घेऊन केशव आपल्या गावाच्या रस्त्याने निघाला. रस्त्यात त्या मुलाची गाडी तशीच पडलेली होती. त्याने आपले जोडे, चपला ठेवण्याची पिशवी उचलली व आपल्या गावाकडे परतला. त्या दिवशी तो तिथूनच शाळेत गेला. शाळेत गेल्यावर त्याने प्रथम आपल्या वर्गशिक्षकांना भेटून झालेल्या परिस्थितीची कल्पना दिली. शिक्षकांनी त्याच्या हिमतीचे कौतुक करीत त्याची पाठ थोपटली. शिक्षकांनी शाबासकी दिल्याने केशवला खूप आनंद झाला व तो आनंदाने वर्गात जाऊन बसला.

Recent Posts

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

32 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

34 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

54 minutes ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

1 hour ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

1 hour ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

2 hours ago