मुंबई : कांदिवलीत शुक्रवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास लिंकरोडवर गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मोटर सायकल वरून आलेल्या दोघांनी हा गोळीबार केला असून त्यात एक २३ वर्षीय तरुण मृत्युमुखी पडला असून अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या शताब्दी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून गणेशोत्सव दरम्यान झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते.
कांदिवलीमधील लालजीपाडा परिसरात हा प्रकार घडला. परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मयत तरुण अंकीत इंद्रमणी यादव हा लालजी पाडा येथील जय भारत कांदिवली या एसआरएच्या रिहॅब इमारतीमध्ये राहत होता. शुक्रवारी रात्री सोनू पासवान उर्फ पासी नावाचा आरोपी त्याच्या अन्य साथीदारासोबत मोटर सायकलवरून आला आणि त्याने लिंकरोडवरील कल्पवृक्ष हाईट्स या इमारतीसमोर उभ्या असलेल्या चार तरुणांवर गोळीबार केला.
गोळीबारात अंकित यादव या तरुणाचा मृत्यू झाला. तर, अभिनाश दाभोळकर, मनीष गुप्ता आणि प्रकाश नारायण जखमी झाले आहेत.
जखमींना उपचारासाठी शताब्दी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.
यापैकी मयत तरुण अंकीत हा अतिगंभीर असल्याने त्याला अधिक उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कांदिवली पोलीस सीसीटिव्ही फुटेज पडताळणी करत आहेत.
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीटदर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने आजपासून…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…