डॉ. लीना राजवाडे
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक राष्ट्र म्हणून आपण केलेल्या प्रगतीबद्दल आपले सर्वांचे कौतुक केले तसेच २०४७ साली भारताचे स्वातंत्र्याचे १००वे वर्ष साजरे होत असताना भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करण्याची ही वेळ आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ‘अमृतकाल’ असे संबोधित पुढील २५ वर्षांच्या वाटचालीत देशवासीयांसाठी पाच प्रतिज्ञांची यादी करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताची ताकद ही विविधता आणि महत्त्वाकांक्षी समाजात आहे.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात प्रत्येक भारतीय नागरिकाने स्वत:साठी आणि अर्थातच देशासाठी करावयाच्या ५ प्रतिज्ञा सांगितल्या. ‘माझे आरोग्य, माझी जबाबदारी’ या संकल्पपूर्तीसाठीदेखील या पाचही प्रतिज्ञा सूत्रांचा नक्कीच विचार करता येईल, असे माझ्या मनात आले. तेव्हा त्यात आरोग्याच्या दृष्टिकोनातून मी अधिक विचार मांडण्याचा प्रयत्न आजच्या लेखात करते आहे.
२०४५ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणे : पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०४५ मध्ये जेव्हा भारत स्वातंत्र्याच्या १००व्या वर्षात प्रवेश करेल, तेव्हा प्रत्येक भारतीयाने भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला पाहिजे. “मी तरुणांना त्यांच्या आयुष्यातील पुढील २५ वर्षे देशाच्या विकासासाठी समर्पित करण्याचे आवाहन करतो; आम्ही संपूर्ण मानवतेच्या विकासासाठी काम करू”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. याचा अर्थ आपण वैयक्तिक, सामाजिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
वसाहतवादाच्या सर्व खुणा काढून टाकणे : पंतप्रधान म्हणाले की, “प्रत्येक भारतीयाने आपल्या कृतीतून आणि आपल्या मानसिकतेतून वसाहतवाद आणि गुलामगिरीच्या अवशेषांपासून स्वत:ची सुटका करणे महत्त्वाचे आहे.” “आम्ही ‘विकसित भारत’साठी काम करण्याचा संकल्प केला पाहिजे आणि आपल्या हृदयाच्या कानाकोपऱ्यांतून औपनिवेशिक मानसिकतेच्या सर्व खुणा काढून टाकल्या पाहिजेत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक, वैचारिक, भावनिक आरोग्यासाठी आपण तेवढेच महत्त्व दिले पाहिजे.
आपली मुळे आणि वारशाचा अभिमान बाळगणे : पंतप्रधान म्हणाले की, “प्रत्येक भारतीयाने देशाच्या वारशाचा अभिमान बाळगला पाहिजे आणि आपण विकासात प्रगती करत असताना रूजले पाहिजे.” “आपल्या वारशाचा, आपल्या मुळांचा आपल्याला अभिमान असायला हवा. कारण जेव्हा आपण आपल्या मुळाशी जोडलेले राहतो, तेव्हाच आपण उंच उडू शकतो आणि जेव्हा आम्ही उंच उड्डाण करू, तेव्हा आम्ही संपूर्ण जगाला उपाय देऊ,” पंतप्रधान म्हणाले. भारतीय शाश्वत मूल्यं, विज्ञान, वैद्यक शास्त्र यात संशोधन झाले पाहिजे. पर्यायी नव्हे, तर ते पहिले वैद्यक शास्त्र वाटले पाहिजे.
एकता आणि अखंडता : समानता हा भारताच्या प्रगतीचा आधार स्तंभ आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, एक राष्ट्र म्हणून आपण ‘भारत प्रथम’ या मंत्राद्वारा एकजूट आहोत, याची खात्री करणे आवश्यक आहे. “विविधतेत एकता सुनिश्चित करण्यासाठी आपण लैंगिक समानता सुनिश्चित केली पाहिजे. आणि हे साध्य करण्यासाठी आपण आपल्या घरातील असमानतादेखील संपवली पाहिजे.” मुली आणि पुत्रांना समान वागणूक दिली नाही, तर एकता राहणार नाही. स्त्री-पुरुष दोघांचेही आरोग्य महत्त्वाचे आहे.
नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना : पंतप्रधान मोदी म्हणाले की, “पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसह भारतातील प्रत्येक नागरिकाने हे सुनिश्चित केले पाहिजे की, देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्यासाठी ते कर्तव्याच्या भावनेने परिपूर्ण आहेत. वीज, पाणी वाचवणे हे लोकांचे कर्तव्य आहे. जर आपण याचे पालन केले, तर आपण वेळेपूर्वी अपेक्षित परिणाम गाठू शकतो, तसेच “कोणत्याही राष्ट्राने प्रगती केली आहे, हे त्यांच्या नागरिकांमध्ये शिस्त कशी रूजलेली आहे, यावरून समजते. सर्वांनी आपल्या जबाबदाऱ्या पाळल्या, तर भारताचा उदय लवकर होईल.”
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…