Friday, May 9, 2025
Homeदेशजगाच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था उत्तम

जगाच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था उत्तम

मुंबई : जगातील गंभीर आर्थिक परिस्थितीच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले. बँक ऑफ बडोदाच्या वार्षिक बँकिंग परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते.

यावेळी रुपयाच्या घसरणीबाबत दास यांनी सांगितले की, रुपयामध्ये तीव्र चढउतार आणि अस्थिरता येऊ दिली जाणार नाही. आरबीआय बाजारात यूएस डॉलरचा पुरवठा करत आहे. त्यामुळे रोखीचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करत आहोत. आरबीआयच्या या पावलांमुळे रुपयाचा व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली आहे. असुरक्षित परकीय चलनाच्या व्यवहारांबद्दल घाबरण्याऐवजी त्याकडे वस्तुस्थितीने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

याप्रसंगी रेपो दरावरील प्रश्नाला उत्तर देताना दास यांनी सांगितले की, तरलता आणि दर वाढविण्याबाबत निर्णय घेताना आरबीआय नेहमीच विकासाचे लक्ष्य लक्षात ठेवते आणि त्यानुसार आरबीआयचे चलनविषयक धोरण धोरण समिती स्वतःची पावले उचलते, असे दास यांनी यावेळी स्पष्ट केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -