प्रियानी पाटील
पावसाळ्यात सेल्फी पॉइंट अक्षरश: बहरून येतात. तशी मनंही फुलारून येतात. एक सेल्फी घेण्याचे कष्ट पाहिले, तर अनेक दिव्य करावी लागतात. मनासारखे सेल्फी येण्यासाठी खरं हसू असण्यापेक्षा खोटं हसू चेहऱ्यावर आणावं लागतं. सेल्फी काढण्याचा आनंद काही वेगळाच.
सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सेल्फी म्हणजे नित्याचेच झाले आहे. एखाद्या नवख्या ठिकाणी गेल्यावर सेल्फी घेतला नाही, तर मनाला राहावणार नाही. तहान-भूक हरपून सेल्फी काढले जातात. मित्र-मैत्रिणींच्या गप्पांपेक्षा सेल्फीत वेळ जास्त वाया गेल्याचे दिसून येते. सेल्फी घेण्याचा वसा आता तसा जुना झाला असला तरी मोह मात्र आवरत नाही, हे देखील तेवढेच खरे आहे. सकाळी उठल्यापासून सेल्फी घेताना मॉर्निंग वॉकपासून ही सुरुवात झालेली दिसून येते. सेल्फी ते रिल्स असा प्रवासाचा टप्पा आतासा येऊन ठेपलेला दिसून येत आहे. सेल्फीच्या नादात अनेक वाईट घटनाही घडलेल्या आजवर पाहिल्या आहेत.
मनाचा खरा पारदर्शकपणा, खरा चकचकीतपणा अनुभवायचा असेल, तर तो सेल्फीतूनच अनुभवावा. आतासं जीवन एवढं धकाधकीचं झालं आहे की, खरं हसू चेहऱ्यावर आणतानाही अंतरीच्या दु:खाला पुसावं लागतं. जीवनाचे खडतर प्रवास सेल्फीतून दिसून येत नाही हेच खरे.
आजच्या सुशिक्षित मुलींना गावाकडे शेती करणारा मुलगा नवरा म्हणून चालेल का? असं विचारलं, तर काय उत्तर येईल हे न सांगताच कळेल. पण रिल्सच्या माध्यमातून पाहिलं, तर मुली जीन्स घालून शेती करतानाचे फोटो, व्हीडिओ डाऊनलोड करताना दिसून येतात. पण प्रत्यक्षात शेती करण्याची वेळ आल्यास ती करावीशी वाटली, तर त्यात खरी धन्यता मानता येईल. या रिल्समध्ये अभिनयाचा कस दिसून येतो. लहानांपासून वयस्कर माणसांपर्यंत सारेजण अभिनय करतात. गाण्यांचे, नृत्याचे रिल्स पाहिले, तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको. कारण आता कुणीही नाचू, गाऊ शकतो. गाण्याची इच्छा अपुरी राहिली असेल, तर अॅपच्या माध्यमातून ती पुरी होऊ शकते. हा आपलाच आवाज आहे का? असे क्षणभर वाटूही शकतं, पण ही खरी वस्तुस्थिती आहे.
मनोरंजानाचा भाग म्हणून आपण यात किती गुंतून राहतो नाही. विरंगुळा म्हणून हे विश्व आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी व्यापून उरलं आहे.
एक जमाना असा होता की, वाचनप्रेमींना पुस्तक वाचल्याशिवाय चैन पडत नव्हती. लायब्ररी तुडुंब भरलेल्या दिसायच्या. आता ओस पडू लागल्या आहेत. कारण वाचनाचा ओघ कमी झाला आहे. देवादिकांची पुस्तकं, कादंबऱ्या, कथा, बालकथा, आदी विविध पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानात पडणारी भर आताशी मोबाइलच्या माध्यमातून आपल्याला इतकी जागवणारी ठरली आहे की, अलार्म लावतानाही मोबाइल, खाता-पिता हातात मोबाइल अशी परिस्थिती येऊन ठेपली आहे.
सेल्फीच्या जगतातून माणूस अजून बाहेर आलेला नाही. रिल्सच्या माध्यमातून माणसाच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते आहे. सासू-सुनेचं नातंही या माध्यमातून घट्ट होताना दिसत आहे. छोट्या बाळाचे बोबडे बोल रिल्सच्या माध्यमातून घराघरात पोहोचत आहेत. खोटी खोटी भांडणं, छोट्या छोट्या स्वरूपात जी लोकांचं मनोरंजन करतील, असे व्हीडिओ लोकांना भावताना दिसू लागले आहेत. विनोदाच्या माध्यमातून हास्याची लकेर उमटत आहेत. आनंदाचा हा परिसस्पर्श, तर नसावा ना?
आज लहान मुलांच्या हातात मोबाइल पाहिला, त्यांचा गेम खेळण्याचा स्पीड पाहिला, तर आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण जग खूप जलद गतीनेच तर पुढे सरसावत आहे. कॉम्प्युटर हा विषय अभ्यासक्रमात आहे. पण तो अनेकांना हार्डही वाटून जातो. पण मोबाइल हाताळताना ही मुलं एखाद्या एक्स्पर्टला मागे टाकतील की काय, असे वाटून जाते. सेल्फी अगदी सहज काढला जातो. गेमचं तंत्र त्यांना अवगत असतं. ऑनलाइनचा खजिना त्यांच्या हातातच असतो. हा एवढा सोपा विषय अभ्यासक्रमात ठेवला, तर दुनिया मुठ्ठीत ठेवूनच ही मुलं वावरतील, असे वाटते. रिल्सच्या माध्यमातून अनेक चेहरे फेमस होऊ लागले आहेत. सेल्फीच्या माध्यमातून धाडसी वृत्ती आत्मसात झालेली दिसून येते. जवळपास मोबाइल हातात आल्यापासून सेल्फी ते रिल्सपर्यंतचा प्रवास हा आजच्या जगात लहानांपासून सगळ्यांनाच आनंद देणाराच मानावा लागेल, असे म्हणायला हरकत नाही.
priyani.patil@prahaar.co.in
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…