रत्नागिरी (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) येत्या २० जुलैऐवजी ३१ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.
ही परीक्षा २० जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती. मात्र सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश स्थिती उद्भवली आहे. बहुतांश ठिकाणी भूस्खलनामुळे वाहतूक बंद आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना दळणवळणात येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित आणि त्यांची सुरक्षा लक्षात घेता परीक्षा पुढे घेतली जाणार आहे. यापूर्वी दिलेले प्रवेशपत्र ३१ जुलै रोजी परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आयुक्तांनी कळविल्याची माहिती येथील जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…