नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय संघ जुलै महिन्याच्या शेवटी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि यजमान वेस्ट इंडिज यांच्यात एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळली जाणार आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माचाही समावेश आहे. शिखर धवनकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. येत्या २२ जुलै २०२२ पासून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. २४ जुलै दुसरा आणि २७ जुलैला तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे. त्यानंतर २९ जुलैला पहिला टी-२० सामना होणार आहे. तर १ ऑगस्टला दुसरा, २ ऑगस्टला तिसरा, ६ ऑगस्टला चौथा आणि ७ ऑगस्टला पाचवा टी-२० सामना होणार आहे.
वेस्टइंडीजविरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ :
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…